ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिंदे विद्यालय चिचोर्डी येथे शालेय मंत्रीमंडळाची स्थापना

मंत्रिमंडळात मुख्यमंत्री कु. दिक्षा कांबळे तर उपमुख्यमंत्री म्हणुन मोहित जीवने

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

यशवंतराव शिंदे विद्यालय चिचोर्डी भद्रावती येथे शैक्षणिक सत्र 2023 – 2024 मध्ये विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. जयंत वानखेडे सरांच्या मार्गदर्शनाखाली शालेय मंत्रीमंडळाची स्थापना करण्यात आली. मंत्रीमंडळात मुख्यमंत्री म्हणून कु. दिक्षा कांबळे व उपमुख्यमंत्री मोहित जीवने यांची निवड करण्यात आली. तसेच क्रिडा मंत्री, सांस्कृतिक मंत्री, पर्यावरण मंत्री, सहल प्रमुख, शिक्षण मंत्री, स्वच्छता मंत्री व अन्न पुरवठा व देखरेख मंत्री यांची सुद्धा निवड करण्यात आली.

यावेळी सर्व नवनियुक्त मंत्र्यांना विद्यालयाचे मुख्याध्यापक डॉ. वानखेडे सरांनी पदांची शपथ देऊन व सर्वांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नंदनवार व देशमुख सरांनी काम पाहिले तसेच सर्व शिक्षकवृदांनी सहकार्य करीत सर्व शिक्षकवृदांनी सर्वांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये