प्रधानमंत्री स्वनिधी (PM SVANidhi) योजनेअंतर्गत कर्ज मंजुरी व वितरण कार्यक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
नगर परिषद, वर्धा येथे प्रधानमंत्री स्वनिधी (PM SVANidhi) योजनेअंतर्गत कर्ज मंजुरी व वितरण कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रमात युनियन बँक ऑफ इंडिया, वर्धा शाखेने सक्रिय सहभाग नोंदविला. युनियन बँक ऑफ इंडिया, वर्धा शाखा प्रमुख श्री. गौरव भगत यांनी लाभार्थ्यांना कर्ज मंजुरी पत्र (Sanction Letter) प्रदान केले.
या उपक्रमांतर्गत १०० पेक्षा अधिक लाभार्थ्यांना कर्ज मंजूर व वितरित करण्यात आले. कार्यक्रमास नगराध्यक्ष मा. श्री. सुधीरभाऊ पांगुळ, एलडीएम श्री. चेतन शिरभाते तसेच श्रीमती ठाकरे मॅडम यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
या माध्यमातून रस्त्यावरील विक्रेते शेख अमीर शेख हमिद ईश्वर विठ्ठलराव बांमटकर आकाश जयंतराव बिभराकड वर्षा महेश भांडेकर व छोट्या व्यवसायिकांना आर्थिक सहाय्य मिळून त्यांच्या उपजीविकेला बळ देण्यात आले. तसेच लाभार्थ्यांना डिजिटल व्यवहारासाठी QR Code उपलब्ध करून देत रोखरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यात आले.



