चंद्रपूरताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपा गडचांदूरच्या वतीने ध्वजरोहन कार्यक्रम संपन्न

यावेळी भाजपा शहर अध्यक्षसह इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. गडचांदूर

भारताच्या 75 व्या स्वातंत्राच्या अमृत महोत्सव साजरा करण्याचा निर्णय भारताचे लोकप्रिय पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदी यांनी घेतला.
त्याचेच पालन करत सम्पूर्ण देश्यात मोठ्या उत्साहाने “हर घर तिरंगा” “हर मन तिरंगा”अभियान राबविण्यात आले.त्याच प्रमाणे गडचांदूर शहरात सुद्धा भाजपा च्या वतीने “हर घर तिरंगा” लावण्या करीता जन जागृती रॅली काढून तसेच पक्ष्या कडून मोफत तिरंगा वाटप करण्यात आले.व लोकांनी उत्तम प्रतिसाद देऊन मोठ्या उत्साहात,स्वयंपूर्तीने 13 ऑगस्टला घरावर तिरंगा लावून शासनाच्या अभियानात सहभाग घेतला.तसेच दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा भारतीय जनता पक्ष्याच्या कार्यलयाकडून 15 ऑगस्ट रोजी भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते श्री उत्तमजी देवकर यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले.यावेळी भाजपा शहर अध्यक्ष सतिश उपलेंचिवार, नगरसेवक अरविंद डोहे,रामसेवक मोरे,माजी नगरसेवक निलेश ताजने,शहर महामंत्री हरीश घोरे,संदीप शेरकी,महादेव जैस्वाल,गोपाल मालपाणी,इम्रान शेख,शर्माजी,श्री जीवतोडे काका, प्रतीक सदनपवार,राकेश अरोरा,जगन्नाथ कापसे,गजानन चिरडे,विलास क्षीरसागर,महेश घरोटे,भास्कर उरकुंडे,प्रवीण देवाळकर,माजी नगराध्यक्ष सौ विजयालक्ष्मी डोहे,महिला आघाडी जिल्हा सचिव सौ रंजना मडावी,सौ सपना सेलोकर,कविता खाडे,सौ सातपुते,निताताई क्षीरसागर,सुंदराबाई दाळे यांचे सह इतर भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button