ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शाळांच्या परिसरात दारू विक्री रोखण्यासाठी बी.एस.पी.ची मागणी

चांदा ब्लास्ट

घुग्घुस, चंद्रपुर : घुग्घुस शहरात शाळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या दारू विक्री व अवैध धंद्यांविरोधात बहुजन समाज पार्टीने (बी.एस.पी.) तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शहराध्यक्ष सिद्दार्थ कोंडागुरला यांनी घुग्घुस पोलीस निरीक्षकांना दिलेल्या निवेदनात शाळांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शहरात दारू विक्रीत मोठी वाढ झाली असून जिल्हा परिषद शाळा, जनता स्कूल, प्रियांदर्शनी स्कूल, माऊंट कार्मेल स्कूल व जी.डी. गोयंका स्कूल यांच्या जवड़पास परिसरातही खुलेआम दारू विक्री होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वातावरणावर विपरीत परिणाम होत असून पालक व नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

बी.एस.पी.च्या मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :

शाळांच्या परिसरातील दारू विक्री तात्काळ बंद करण्यात यावी., अवैध दारू विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी., भविष्यात शाळा, कॉलेज व धार्मिक स्थळांच्या जवळ अशा प्रकारचा व्यवसाय होणार नाही याची हमी द्यावी., शहरातील सर्व अवैध धंदे बंद करण्यात यावेत.

अन्यथा बी.एस.पी. तर्फे तीव्र आंदोलन उभारले जाईल, असा इशारा कोंडागुरला यांनी दिला आहे.

या निवेदनाची प्रत जिल्हाधिकारी चंद्रपूर व पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांनाही देण्यात आली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये