मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करा
अग्रसेन चौक येथील रहिवासीची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा येथे मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून नागरिक त्रस्त झाले आहे.
अग्रसेन चौक येथील रहिवासी त्रस्त झाले असून त्यांनी मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन तात्काळ कारवाई करून बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.
याच परिसरात श्री कालीचा मारोती मंदिर आहे, मोकाट कुत्रे मंदिरात तसेच देवांच्या मूर्तीवर मूत्र विसर्जन, तसेच विष्ठा करून मंदिराचे पावित्र्य धोक्यात आले आहे.
मंदिर परिसरातील नागरिकांना, लहान मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, नगर परिषद ने याकडे लक्ष वेधून मोकाट कुत्र्यांचा तात्काळ बंदोबस्त करून नागरिकांना दिलासा देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
निवेदनावर कैलास धन्नावत, रवींद्र मोहिते, कविश जिंतूरकर, अमोल जिंतूरकर, सुशांत जिंतूरकर, हर्षल पवार, गोविंद शर्मा, राजेश धन्नावत, सुजित मुंढे, व इतर नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहे.



