ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महागड्या गाडीतून सुरू होती दारूची तस्करी

विशेष पथकाची मोठी कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

      आज 31.07.2024 रोजी 02.00 वाजता सुमारास मिळालेल्या गोपनीय माहिती च्या आधारे स.पो.नि. मंगेश भोयर, विशेष पथक सह तसेच पोस्टे सेलू चा स्टाफ मिळून प्रो. रेड केला असता. आरोपी वाहन सोडून पसार झाला त्याचे वाहण व त्यातील दारूचा मुद्देमाल असा एकूण 11,88,400/-₹ चा जप्त केला आहे.

पो.स्टे. – सेलू घटनास्थळ – जामनी शिवार आरोपी – 1) मुकेश उर्फ मोनु विश्वकर्मा वय 32 वर्षे रा. समता नगर, वर्धा (फरार)2) विटाला जि. अमरावती येथील बारचा मालक. मुद्देमाल :-1) 500 ml चे बडव्हायझर् कंपनीचे बियर ने भरलेल्या 36 कॅन प्रती की.300/-₹ नुसार 10,800/-₹ 2) 90 ml चे टांगो कंपनीचे देशी दारू ने भरलेल्या 400 बॉटल्स प्रती की.50/-₹ नुसार 20,000/-₹ 3) 180 ml चे ऑफिसर चॉईस ब्ल्यू कंपनीचे दारूने भरलेले 156 बॉटल्स किंमत 46,800/-₹ 4) 180 ml चे रॉयल स्ताग कंपनीचे व्हिस्की ने भरलेले 168 बॉटल्स किंमत 56,800/-₹ 5) 180 ml चे ऑफिसर चॉईस व्हिस्की ने भरलेले 216 बॉटल्स किंमत 54,000/-₹ 6) एक hyundai CRETA कंपनीची कार क्र MH 19-CU-0004 किंमत 10,00,000/-₹

अशा एकूण 11,88,400/-₹ चा माल जप्त करण्यात आला असून पो.स्टे. सेलू येथे अपराध क्र. 653/23 कलम 65 (E), (A), 77 (a), 82 मदाका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

   कारवाई पथक पोलिस अधीक्षक, वर्धा नुरुल हसन, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. सागर कुमार कवडे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. मंगेश भोयर, पो. हवा. रोशन निंबोळकर, ना.पो.अं. सागर भोसले, पो. अंम. केलास वालदे, प्रदीप कूचनकर, सुगम चौधरी सर्व विशेष पथक, स्था.गु.शा. वर्धा व चा.पो.शि. महेश कावळे, पो.मू. वर्धा यांनी तसेच पो.स्टे. सेलू यांचे स्टाफ सह केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये