Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

माजी पंतप्रधान स्व मनमोहन सिंग यांना देऊळगाव राजा शहर काँगेस कमिटीच्या वतीने श्रद्धांजली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

भारताचे माजी पंतप्रधान स्व मनमोहन सिंग यांना देऊळगाव राजा शहर काँगेस कमिटी च्या वतीने आज शासकीय विश्राम गृह येथे भावपुर्ण श्रध्दांजली वाहण्यात आली.

कांग्रेस चे जेष्ठ नेते सेवानिवृत्त उप जिल्हाधिकारी रमेश कायंदे यांनी माजी पंतप्रधान स्व मनमोहन सिंग यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला, देशाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात त्यांनी आखलेली आर्थिक रणनीती अविस्मरणीय आहे, जागतीक पातळीवर भारताचे नाव पोहचिवण्यात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहेत, त्यांनी अनेक महत्वपूर्ण विकास योजना भारतात सूरू करुण देश प्रगतीपथावर नेला असे सांगितले . शहर अध्यक्ष विष्णू झोरे, रामदास डोईफोडे, पापासिंग बावरे, यांनी सुद्धा मनमोहन सिंग यांच्या कार्याचा गौरव केला.

स्व. पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून 2 मिनिट मौन बाळगून श्रध्दांजली वाहण्यात आली.

याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे नेते डॉ. अशोक काबरा, माजी नगरसेवक हनीफ शहा, निखिल जायभाये, अशोक सानप,गणेश आडे, अशोक झिणे,शौकत भाई, प्रा अशोक डोईफोडे, रफिक पठाण,नाझेर बागवान, दयासिंग बावरे, रवी इंगळे, सय्यद इजाज,रवी पिंपळे, सूर्याजी चव्हान,पप्पू सेठ, अब्बास शहा, सोहील शहा, शेख मोहम्मद, तथा इतर उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये