Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर पोलिसांची कारवाई

बोनथळा फाट्यावरील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       मिळालेल्या एका गुप्त माहितीच्या आधारे भद्रावती पोलिसांनी एका अवैध रेती तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई करीत दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सदर कारवाई दिनांक 15 रोज बुधवार ला पहाटेच्या वेळी भद्रावती पोलिसांतर्फे करण्यात आली.

या कारवाईत 5,000 रुपये किमतीची रेती व तस्करीसाठी वापरलेले ट्रॅक्टर व ट्रॉली किंमत चार लाख रुपये असा चार लाख पाच हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

वाळू तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर नाकेबंदी करून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या एम.एच. 36 एल 21 51 या ट्रॅक्टर वर कारवाई करीत चालक समीर बंडू चौधरी, वय 21 वर्षे, राहणार मांगली व भारत वसंता बोढेकर, राहणार मांगली यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले आहे.

सदर कारवाई ठाणेदार अमोल काचोरे यांच्या मार्गदर्शनात गजानन तुपकर, अनुप आष्टुकर, जगदीश झाडे, विश्वनाथ चुदरी, निकेश ढेंगे, रोहित चीटगिरे, योगेश घाटोळे यांनी केली. घटनेचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये