ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मतदान प्रक्रियेत सर्वांनी सहभाग नोंदवावा – आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अकुनुरी नरेश

महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने मनपाची पत्रकार परिषद

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर :_ मा. राज्य निवडणूक आयोगाने दिनांक १५ डिसेंबर, २०२५ रोजी जाहीर केलेल्या सार्वत्रिक निवडणूक २०२५ चे वेळापत्रकानुसार चंद्रपूर महानगरपालिका मतदार संघांकरीता दिनांक १५ जानेवारी २०२६ (गुरुवार) रोजी सकाळी ०७:३० ते सायं. ०५:३० या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यांत येणार आहे. सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमाची माहिती चंद्रपूर महानगरपालिका आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अकुनुरी नरेश यांनी १६ डिसेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

 सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम –

१. नामनिर्देशपत्र देण्याचा कालावधी – दि.२३ डिसेंबर २०२५ (मंगळवार) ते दि. ३० डिसेंबर २०२५ (मंगळवार), (सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत) –

(गुरुवार दि.२५ डिसेंबर, २०२५ व रविवार दि.२८ डिसेंबर, २०२५ रोजी नामनिर्देशनपत्रे देण्यात येणार नाहीत)

२. वरील नामनिर्देशनपत्रे स्विकारण्याचा कालावधी – दि. २३ डिसेंबर, २०२५ (मंगळवार) ते दि. ३० डिसेंबर, २०२५ (मंगळवार) (सकाळी ११ ते दुपारी ३)- (गुरुवार दि.२५ डिसेंबर, २०२५ व रविवार दि. २८ डिसेंबर, २०२५ रोजी नामनिर्देशनपत्रे स्विकारण्यात येणार नाहीत)

३. नामनिर्देशनपत्रांची छाननी – दि. ३१ डिसेबर, २०२५ (बुधवार) – (सकाळी ११.०० वाजल्यापासून)

४. वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे – छाननी पूर्ण झाल्यानंतर लगेच

५. उमेदवारी मागे घेण्याचा अंतिम दिनांक – दि. ०२ जानेवारी, २०२६ (शुक्रवार) पर्यंत (सकाळी ११ ते दुपारी ३)

६. निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिनांक – दि. ०३ जानेवारी, २०२६ (शनिवार) ,(सकाळी ११.०० वाजल्यापासून)

७. अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिध्द करणे – दि. ०३ जानेवारी, २०२६ (शनिवार)

८. आवश्यक असल्यास मतदानाचा दिनांक – दि. १५ जानेवारी, २०२६ (गुरुवार), (सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंव)

९. मतमोजणी व निकाल जाहीर करण्याचा दिनांक – दि. १६ जानेवारी, २०२६ (शुक्रवार) (सकाळी १०.०० वाजल्यापासून)

१०. शासन राजपत्रात निकाल प्रसिध्द करणे – दि. १९ जानेवारी, २०२६ (सोमवार) पर्यंत.

चंद्रपूर महानगरपालिका मतदारक्षेत्रासाठी निवडणूक प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडणेकरीता महानगरपालिका प्रशासनाकडून पुढील प्रमाणे तयारी करण्यांत आली आहे.

१. एकूण प्रभाग – १७

२. निवडून द्यायच्या उमेदवारांची संख्या – ६६

३. एकुण मतदार केंद्रांची संख्या – ३५५

४. एकुण मतदारांची संख्या – २ लक्ष ९९ हजार ९९४

पुरुष मतदार संख्या – १ लक्ष ४९ हजार ६०९

महिला मतदार संख्या – १ लक्ष ५० हजार ३५४

इतर मतदार संख्या – ३१

५. दिव्यांग पुरुष मतदार – 532

दिव्यांग महिला मतदार – 275

एकुण दिव्यांग मतदार -807

६. चंद्रपूर मनपा झोन क्र. ३ कार्यालय येथे Strong Room बनविण्यात आली असुन मतमोजणी इथेच करण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे सिंगल विंडो सिस्टम,टोल फ्री क्रमांक, आचारसंहिता कक्ष आदी सुविधा मनपातर्फे करण्यात येणार आहे.

७. दिव्यांग व्यक्तींसाठी उपाययोजना – मनपा क्षेत्रातील प्रत्येक मतदान केंद्रांवर दिव्यांग मतदाराकरीता त्यांचे मागणीचे अनुषंगाने Wheelchair ची व्यवस्था करण्यांत आली आहे. मा. निवडणूक आयोगाचे निर्देशानुसार सर्व मतदान केंद्रांवर या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यांत आलेल्या आहेत जसे रॅम्प, पिण्याचे पाणी,बसण्याची व्यवस्था,प्रसाधनगृह .

   चंद्रपूर महानगरपालिका मतदार क्षेत्राकरीता दिनांक 15 जानेवारी 2026 (गुरुवार) रोजी सकाळी 07:30 ते सायं. 05:30 या कालावधीत मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यांत येणार असल्याने सर्व नागरिकांनी मतदान करून आपला मतदानाचा अधिकार बजावावा व देशाच्या सर्वांगीण विकासामध्ये आपला सहभाग नोंदविण्याचे आवाहन आयुक्त तथा निवडणूक अधिकारी अकुनुरी नरेश यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये