ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पदवीसह कौशल्य आणि सतत शिकण्याची वृत्ती हाच यशाचा मंत्र: _ मा.प्रशांत कडाव

महिला विद्यापीठात "प्रशिक्षण व रोजगार" विषयावर अतिथी व्याख्यान

चांदा ब्लास्ट

बीसीए विभागाअंतर्गत आयोजन

एसएनडीटी महिला विद्यापीठ,मुंबई च्या बल्लारपूर आवारात “प्रशिक्षण व रोजगार” (Training and Recruitment) या विषयावर कॉम्प्युटर ऍप्लिकेशन विभागाअंतर्गत 15 डिसेंबर रोजी अतिथी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात दीर्घ अनुभव असलेले ज्येष्ठ आयटी व्यावसायिक श्री. प्रशांत कडाव यांनी प्रमुख अतिथी व वक्ता म्हणून विद्यार्थिनींना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले हे होते. यावेळी सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड तसेच आवाराचे समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

आपल्या मार्गदर्शनातून प्रशांत कडाव यांनी विद्यार्थ्यांना उद्योगजगताच्या अपेक्षा, आधुनिक कौशल्यांचे महत्त्व, सतत शिकण्याची वृत्ती आणि सकारात्मक दृष्टिकोन याबाबत सखोल माहिती दिली. “फक्त पदवी पुरेशी नसून, तांत्रिक कौशल्यांसोबत संवादकौशल्य, टीमवर्क आणि समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता विकसित करणे आजच्या स्पर्धात्मक युगात अत्यंत आवश्यक आहे,” असे मौल्यवान विचार त्यांनी मांडले.

कार्यक्रमाचे संचालन सहायक प्राध्यापिका शीतल बिल्लोरे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी रुग्वेद खंगमपट्टीवार यांनी आभारप्रदर्शन करून मान्यवरांचे, आयोजकांचे व उपस्थित विद्यार्थ्यांचे आभार मानले.

या व्याख्यानामुळे विद्यार्थ्यांना करिअरविषयक दिशा मिळाली असून उद्योगजगतासाठी स्वतःला कसे तयार करावे याबाबत प्रेरणा मिळाल्याची भावना उपस्थित विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये