ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळण्यास विलंब

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळण्यास मोठा विलंब होत असल्याने शेतीच्या हंगामात आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या जिवती शाखेकडे गेल्या महिन्याभरापासून शेतकऱ्यांनी पिक कर्जासाठी अर्ज केले होते. बँकेने शेतकऱ्यांचे सातबारा तपासणीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठवले, परंतु तपासणी प्रक्रिया प्रलंबित असल्याने कर्ज वितरण रखडले आहे.

          यामुळे शेतकऱ्यांना रासायनिक खते, औषधे आणि इतर शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ऐन पेरणी हंगामात कर्ज मिळण्यास विलंब होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी जिवती तहसीलदारांकडे तक्रार केली असता, त्यांना उडवाउडवीची उत्तरे मिळाल्याचा आरोप आहे.

शेतकऱ्यांनी प्रशासन आणि बँक अधिकाऱ्यांनी तातडीने तपासणी प्रक्रिया पूर्ण करून कर्ज वितरणाला गती द्यावी, अशी मागणी केली आहे. अन्यथा, शेतीच्या कामांना खीळ बसेल, अशी भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. याबाबत तहसील कार्यालय आणि बँक प्रशासनाकडून कोणतेही ठोस उत्तर मिळालेले नाही.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये