Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

प्रभारी शिक्षणाधिकारी (माध्य.) ह्यांचेवर शिस्तभंगाची कारवाई करा, माजी आ. ना. गो. गाणार ह्यांची मागणी

उच्च न्यायालयानेही दिले आहेत कारवाईचे आदेश

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

चंद्रपूर जिल्हापरिषदेच्या माध्यमिक उपशिक्षणाधिकारी निकिता ठाकरे यांच्याकडे असलेला शिक्षणाधिकारी पदाचा कार्यभार तत्काळ काढून घेऊन त्यांच्यावर मा. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने 4 जुलै रोजी दिलेल्या आदेशानुसार शिस्तभंगाची तत्काळ कारवाई करावी अशी मागणी माजी शिक्षक आमदार ना. गो. गाणार ह्यांनी शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर यांचेकडे पत्राद्वारे केली आहे.

प्राप्त माहितीनुसार कल्पना चव्हाण, शिक्षणाधिकारी (माध्य.) जि.प. चंद्रपूर यांची बदली झाल्यामुळे शिक्षणाधिकारी पदाचा पदभार उपशिक्षणाधिकारी, निकिता ठाकरे यांना नियमबाह्यरित्या सोपविण्यात आला. त्यांचेपेक्षा वरिष्ठ दर्जाचे अधिकारी कार्यरत असताना त्यांना डावलून निकिता ठाकरे यांना शिक्षणाधिकारी पदाचा पदाभार देणे अयोग्य व नियमबाह्यच असुन त्यांच्याविरुध्द शिक्षण उपसंचालक, नागपूर विभाग, नागपूर यांच्या दि. २४/०६/२०२४ च्या पत्राचे अनुपालन न करणे, प्रभुरामचंद्र विद्यालय नांदा, त. कोरपना, जि. चंद्रपूर येथील भ्रष्टाचार करणाऱ्याला संरक्षण देणे, वरिष्ठ/निवड वेतनश्रेणीचा प्रस्ताव प्रलंबित ठेवणे, शिवाजी विद्यालय, कोंढा, त. भद्रावती, जि. चंद्रपूर येथील भ्रष्टाचाराच्या प्रकरणात दिरंगाई करणे, लोकमान्य विद्यालय वरोरा, जि. चंद्रपूर येथील ९ अवैध कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करणे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक/शिक्षक कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभापासून वंचित ठेवणे इत्यादी अनियमित व गैरप्रकार राजरोसपणे करण्यात येत असल्याच्या तक्रारी दाखल असल्याने निकिता ठाकरे या शिक्षणाधिकारी पदाचा पदभार सांभाळण्यास सक्षम नसल्याचे स्पष्ट होते असे ना. गो. गाणार ह्यांनी आपल्या मागणीत स्पष्ट केले आहे.

त्याचप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सुद्धा दि. ०४ जुलै २०२४ च्या आदेशात त्यांचेविरूद्ध कारवाई करण्याचे निर्देश दिले असल्याने त्यांचेकडे असलेला प्रभार तात्काळ काढून घेणे व त्यांचेविरूद्ध शिस्तभंगाची कारवाई करणे अत्यावश्यक व निकडीचे आहे यास्तव निकिता ठाकरे, प्रभारी शिक्षणाधिकारी (माध्य) जि.प. चंद्रपूर यांचेकडे असलेला शिक्षणाधिकारी पदाचा प्रभार तात्काळ काढून त्यांचेविरूद्ध त्वरीत शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी माजी शिक्षक आमदार ना. गो. गाणार ह्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली असुन ह्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी काय निर्णय घेतात ह्याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये