टेकामांडवा जिल्हा परिषद शाळेची मानिकगड परिसरात क्षेत्रभेट

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा टेकामांडवा येथील विद्यार्थ्यांची क्षेत्रभेट तालुक्यात स्थित असलेल्या, पर्यटनासाठी प्रसिद्ध व विविध प्रकारच्या वनसंपत्तीने नटलेल्या ऐतिहासिक माणिकगड किल्ला व परिसरात काढण्यात आली होती. विद्यार्थ्यांना परिसराची माहिती व्हावी व आपल्या परिसरात असलेल्या ऐतिहासिक गोष्टी व घटना विद्यार्थ्यांना माहिती असाव्यात या उद्देशाने शाळेची क्षेत्रभेट मानिकगड किल्ला परिसरात काढण्यात आली.यावेळी तत्कालीन नागवंशी राजांच्या वैभवशाली इतिहासाची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.
निसर्गाने बहरलेल्या किल्ल्याची वैशिष्ट्यपूर्ण माहिती तसेच विविध प्रकारची अतिशय जुनी झाडे, तट, टेहाळणी बुरुज, पाताळ विहीर, राणीचा महल,तत्कालीन तोफा या सर्वांची माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. अतिशय उत्साहात ही क्षेत्रभेट पार पडली इयत्ता ३ री ते ७ वि च्या ८० विद्यार्थ्यांनी या क्षेत्रभेटीचा मनमुराद आनंद घेतला.शाळेचे मुख्याध्यापक जांभूळकर,सहशिक्षक दिपक गोतावळे, प्रभाकर पवार,जयश्री घोळवे,पायल कुकडे,गंगाधर पांचाळ, मदतनीस बालाजी मुंगरे यांनी सहलीचे यशस्वी नियोजन केले.



