कॉंग्रेस/शेतकरी संघटना जिवती तालुक्याचे पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
चंद्रपूर जिल्ह्यातील तेलगणा सीमेवर असलेल्या जिवती तालुक्यातील शेतकरी संघटना तसेच काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शेतकरी संघटना व काँग्रेसला राम राम करीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात चंद्रपूर येथे छोटे खाणी कार्यक्रमात राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आबिद अली राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांच्या नेतृत्वात शब्बीर जागीरदार बालाजी पुल्लेवाड सुरेश निलेवाड आरिफ भाई पाटण उद्धव गोतावळे कुंभेझंरी इत्यादींनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
जिल्हा अध्यक्ष नितीन भटकर यांनी सर्वांना पक्षाचे दुपट्टे देऊन स्वागत व प्रवेश दिला जिवती तालुक्यात यापूर्वी पक्षाने जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये संधी दिली व येथून लोकप्रतिनिधी निवडून देखील जनतेने दिले राष्ट्रवादी काँग्रेस हे शाहू फुले आंबेडकर मौलाना आझाद यशवंतराव चव्हाण यांच्या विचारावर जन सामान्य नागरिकांना सोबत घेऊन वाटचाल करणारा पक्ष असून अजित दादाच्या नेतृत्वात विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते पक्षामध्ये प्रवेश घेत आहे नृकत्याच होत असलेल्या नगर परिषदेमध्ये अनेक तरुणांना व सर्व समावेशक जातीपातीचे राजकारण न करता निष्ठावंत व जनतेच्या प्रश्नाला धावून जाणाऱ्या कार्यकर्त्यांना संधी दिली आहे.
जिवती तालुक्यातील कार्यकर्त्यांना सन्मानाची वागणूक या पक्षात मिळेल तसेच राज्याचे राज्यमंत्री आदिवासी विकास बांधकाम तथा चंद्रपूर जिल्ह्याचे संपर्क मंत्री इन्द्निल नाईक यांचा लवकरच दौरा आयोजित करून दुर्गम आदिवासी भागातील जिवती तालुक्यातील कार्यकर्त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात येईल अशी माहिती जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी दिली


