ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपा चंद्रपूर तुकूम प्रभाग १ च्या वतीने विश्व मधुमेह दिनानिमित्त भव्य जनजागृती कॅम्प

२४० नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

चांदा ब्लास्ट

विश्व मधुमेह दिनानिमित्त भाजपा चंद्रपूर प्रभाग १ व क्राईस्ट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या सहकार्याने तुकूम प्रभाग १ मध्ये मधुमेह जागरूकता शिबीर आयोजित करण्यात आले. नागरिकांच्या आरोग्यप्रबोधनासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला तुकूमवासियांकडून उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद लाभला. शिबिरात नागरिकांमध्ये मधुमेहविषयक प्रतिबंध, योग्य जीवनशैली, संतुलित आहार आणि नियमित तपासणीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. धकाधकीच्या जीवनशैलीत आरोग्याची काळजी घेण्याचे वाढते महत्त्व लक्षात घेता असा लोकाभिमुख उपक्रम नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरला.

हे जनजागृती शिबिर तुकूम प्रभाग १ चे माजी नगरसेवक व चंद्रपूर शहराचे जिल्हाध्यक्ष सुभाष कासनगोटटूवार यांच्या नेतृत्वात पार पडले. लोकाभिमुख उपक्रम सातत्याने राबविण्याच्या निर्धारातून ह्या कार्यक्रमात २४०नागरिकांनी तपासणीचा लाभ घेऊन शिबीर अत्यंत यशस्वी केले.

शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी क्राईस्ट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे व्यवस्थापक माननीय फादर बिबीन तेक्केकरा, सहसंचालक डॉ. मेजो जोसेफ, अधिपरिचारिका सिस्टर चैतन्य, प्रमोद सॅमसन, डॉ. जितिन डेविड, डॉ. प्रीती कांबळे, अमोल रुयारकर, अमरीन शेख, विलास कावळे, विकास झोडे यांची उपस्थिती विशेषत्वाने लाभली. त्यासोबतच, जिल्हा महिला मोर्चा महामंत्री प्रज्ञा गंधेवार आशाताई बेले,सीमा मडावी, चंदाताई इटणकर, अनिल फुलझेले, अमोल लोणारवार, सुधाकर टिकले, संजय कोत्तावार, सुवर्णा लोखंडे, आणि मंजुश्री कासनगोट्टूवार यांनीही सक्रिय सहभाग नोंदवत शिबिराला बळ दिले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये