दारू पिवून दारूच्या नशेत प्रवासी भरून ऑटो चालवीणारे चालकवर गुन्हा दाखल
तसेच मोठ्या आवाजचे सायलेंसर बिनापरवाना बदल केलेले 4 बुलेटवरही शाखेची कार्यवाही

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दि. 03/11/25 रोजी वर्धा येथील आर्वी नाका चौकात मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन सर यांच्या आदेशान्वये वाहने तपासनी करणेस वाहतूक नियंत्रण शाखेकढून नाकाबंदी ही नेमण्यात आलेली होती, नाकाबंदी दरम्यान एक ऑटो रिक्षात रिक्षा चालक प्रवासी वाहतूक करताना व अतिवेगाने व निष्काळजीपणे वेडी वाकडी ऑटो चालवीतना वाहतूक पोलिसांना दिसून आला तेव्हा वाहतूक पोलिसांनी त्याची ऑटो नंबर MH 32AK 0340 थामविली असता तो दारू पिवून दारूच्या नशेत असल्याचे त्याच्या तोंडाला येणाऱ्या वासावरून दिसून आले त्यावरून त्याची मेडिकल तपास्नी केली असता तो दारूच्या नशेत असल्याचे त्याच्या रक्तात दारू असल्याचे मेडिकल प्रमाणपत्र प्राप्त झाले.
त्यावरून ऑटो चालक कैलास भास्कररावं आडे वय 25 वर्ष रा. सिंधी मेघे वर्धा याच्या विरुद्ध मोटार वाहन कायदा कलम 185 अन्वये पो. स्टे. वर्धा शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला व सदर ऑटो हा जप्त करण्यात आला आहे . तसेच मोठ्या आवाजचे सायलेन्सर लावून फटाके फोडणाऱ्या कर्कश आवाजाच्या 4 बुलेटचे चालकावर कलम 194 मोवाका कलमनवये कार्यवाही करून 4 सायलेंसर जप्त करून 10.000 रुपयांचा दंड ही वसूल करण्यात आलेला आहे.
सदर कार्यवाही ही स पोउपनि संजय भांडेकर पो हवा दिलीप कामडी, पो हवा आशिष देशमुख यांनी आर्वी नाका चौकात रात्री 08/00 वाजता केली आहे.
तरी वाहतूक शाखे कडून सर्व वाहन चालक यांना आवाहान करण्यात येते कि कोणीही आपले वाहन हे दारू पिवून चालवू नये, बुलेट ला मोठ्या आवाजचे बिनापरवाना मॉडिफाईड केलेले सायलेंसर लावून वापर करू नये अन्यथा कठोर कार्यवाही ही करण्यात येईल
पोलीस निरीक्षक विलास पाटील वाहतूक शाखा वर्धा.



