ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गडचांदुरातील ‘रेल्वे अंडरपास’ ठरतोय त्रासदायक

नव्याने अंडरपास बोगदा बनवण्याची श्रीकांत मोहारे यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदुर शहरातील प्रभाग क्रमांक एकमधील पिंपळगाव रोड वरील रेल्वे अंडरपास नागरिकांना डोकेदुखी ठरत आहे.अनेक वर्षापासून याठिकाणी रेल्वे रूळ तयार आहे.येथूनच सिमेंट निर्यात होत असते.गडचांदुर शहरातून पिंपळगाव जाण्यायेण्यासाठी याच अंडरपास मधून प्रवास करावा लागतो.

या रेल्वे अंडर पास मधून वाहनाना येजा करण्यात अडचणी येत असल्याचे वाहनचालक सांगतात.याच ठिकाणा मधून समोरच बाजार समिती कार्यालय असून याठिकाणी आठवडी बैल बाजार सुधा मोठ्या प्रमाणात भरत असतो.

पावसाळ्याच्या दिवसात सुद्धा या ठिकाणी पाणी साचून राहत असल्याचे चित्र दिसते.त्यामुळे वाहनचालकांना समस्या निर्माण होत असतात.संबंधित विभागाने या बोगद्याची डागडुजी करून मोठ्या स्वरूपाचा अंडर पास चा रस्ता तयार करण्याची मागणी नागरिकांसह येथील श्रीकांत मोहारे केली आहे.

संबंधित अंडर पास नव्याने मोठ्या स्वरूपाचा करणे गरजेचे झाल्याचे चित्र दिसून येत आहे.दिवसेंदिवस या भागात रहदारी,प्रवासी चारचाकी वाहने येजा करतात. बाजार समिती असल्याने अनेक वाहने सुधा येजा करतात.त्यामुळे याठिकाणी नव्याने अंडर पास तयार करण्याची गरज आहे.

                          श्रीकांत मोहारे,  रहिवाशी

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये