आनंदवन येथे पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
"स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपुर यांचे द्वारा सहयोग

चांदा ब्लास्ट
पदाविभूषण डॉ. बाबा आमटे यांच्या प्रेरणेतून सुरू असलेल्या आनंदवनातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, या हेतूने स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र प्रिंदि चॅरिटेबल ट्रस्टद्वारा आज (दि. ३) रोज सोमवारला आनंदवन येथे डेअरी प्रकल्पाच्या बाजूला आधुनिक पाणी शुद्धीकरण प्रकल्प लोकार्पीत केला.
आनंदवनातील या आधुनिक पाणी शुद्धीकरण प्रकल्पाचे उद्घाटन महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आमटे पांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार करण संजय देवतळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. यावेळी ट्रस्टचे संस्थापक सदस्य रविंद्र शिंदे उपस्थित होते.
स्वः श्रीनिवास शिंदे मेमोरियल रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक सदस्य रवींद्र शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली की, पद्मविभूषण डॉ. बाबा आमटे व साधनाताई आमटे यांनी स्थापन केलेल्या आणि जगभरात आपल्या सेवेसाठी ओळखल्या जाणाऱ्या आनंदवनातील नागरिकांसाठी आमच्या ट्रस्टच्या माध्यमातून शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. पद्मविभूषण डॉ. बाबा आमटे यांच्या सेवेच्या वटवृक्षाला स्व श्रीनिवास शिंदे मेमोरियत श्री रवींद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्टकडून जतार्पण केल्यासारखे आहे.
यावर समाजसेवक विकास आमटे यांनी मानू नको घोर तु, ठेवी जोर सोर तू.. चाल पुढे सेवका, मोह सोडुनी… या उक्तीची उपमा देत रविंद्र शिंदे हे केवळ सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यकर्ते नाहीत, तर निः स्वार्थ भावनेने काम करणारे नेतृत्व आहे. त्यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, तसेच गरजू नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. गोरगरीब, शेतकरी, कामगार आणि वंचित घटकांसाठी नेहमीच हातभार लावणारे हे नेतृत्व जनतेचा नेता म्हणून ओळखले जाते. असे बोलून दाखविले.
या आधुनिक पाणी शुद्धीकरण प्रकल्प उपक्रमामुळे आनंदवनवासीयांना शुद्ध पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होणार आहे. है कार्य केवळ सेवा नाही, तर समाजाप्रती असलेल्या कर्तव्यभावनेचे आणि संवेदनशीलतेचे अनमोल उदाहरण आहे, असे आमदार करण देवतळे म्हणाले.
या कार्यक्रमाला समाजसेवक डॉ. विकास आमटे, आमदार करण देवतळे, रवींद्र शिंदे, ट्रस्टचे अध्यक्ष धनराज आस्वले. गुरुकुंज मोझरीचे लक्ष्मणराव गमे, पाथ्रीकर, माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर, सुनील नामोजवार, जयंत ठाकरे, प्रवीण बदकी, शंकर धानोरकर, विजय मोकाशी, निखिल हिवरकर, कृ.उ.बा.स. सभापती राजू ठोंगे, राजू मिश्रा, खेमराज कुरेकर सुधाकर कडू, रोहन कुटेमाटे, रमेश मेश्राम, संजय उमरे, लक्ष्मणराव ठेंगणे तसेच स्थानिक आनंदवन ग्रामपंचायतीच्या सरपंच कु. रूपवंती मधुकर दरेकर, उपसरपंच शौकतअली बुडनसाब खान, ग्रामपंचायत सदस्य सुनिल विठोबाजी नक्षिणे, आनंदराव जयराम नाहाले, राजेंद्र जानराव बोंदरकर, श्रीमती. संगीता अरविंद धोंगडे, नंदा दिपक शिव, ज्योती गणेश टेकाम, सी. प्रिया राजेश ताजने, ग्रामपंचायत अधिकारी कु. विदया बापूजी गिलबिले आदी मान्यवर उपस्थित होते.



