ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागेश रायपुरे यांची पोलीस पाटील पदी निवड

डोनाळा येथे पोलीस पाटील पदासाठी एकूण २१ उमेदवारांनी केलेला होता अर्ज

चांदा ब्लास्ट
गावात शांतता व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या पोलीस पाटील पदासाठी जिल्ह्यात पदभरती सुरू होती. यामध्ये मुल उपविभागाअंतर्गत येणाऱ्या सावली तालुक्यातील डोनाळा गावाचा सुध्दा समावेश होता.डोनाळा येथे पोलीस पाटील पदासाठी एकूण २१ उमेदवारांनी अर्ज केलेला होता. २५ जुन रोज शनिवारला कर्मवीर महाविद्यालय मुल येथे पोलीस पाटील पदासाठीची परिक्षा पार पडली.
यात एकूण २१ परीक्षार्थींपैकी फक्त दोनच परीक्षार्थी मुलाखती साठी पात्र ठरू शकले. त्यांची मुलाखत परिक्षा दिनांक १२ जुलै २०२३ ला पार पडली. यात डोनाळा येथील नागेश रायपुरे उत्तम गुणांनी उत्तीर्ण होत त्यांची डोनाळा येथील पोलीस पाटील या पदावर यांची निवड झालेली आहे. या निवडीबद्दल गावातील युवक सुरज गेडाम, सचिन गोवर्धन, प्रणीत मेश्राम व सर्व मित्र परिवार यांनी रायपुरे यांचा सत्कार केला
शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये