ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लग्नघरी लागली आग., 50 हजाराचे नुकसान

सुमठाना येथील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

            भद्रावती शहरातील नविन सुमठाना येथील एका लग्न घरी आग लागून जवळपास 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना दुपारी अकरा वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत वेळीच अग्निशामक दलाने घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी अनुचित घटना टळली. मात्र या आगीत स्वयंपाक घरातील फ्रिज सह अन्य साहित्य जळाल्याने घर मालकाचे जवळपास 50 हजाराचे नुकसान झाले आहे.

शहरातील सुप्रसिद्ध व्यापारी तथा अमन गारमेंट चे संचालक अब्बास हुसेन यांच्या मुलीचा लग्न समारंभ पार पडल्यानंतर दुसऱ्या दिवशी घरातील दुसऱ्या मजल्यावर पाहुणेमंडळीसाठी स्वयंपाक करणे सुरू होते. मात्र सिलेंडर लिकेजमुळे अचानक आग लागली व पाहता पाहता ही आग खोलीत सर्वत्र पसरली. सदर घटनेची सूचना नगरपरिषद तथा आयुध निर्माणी आपत्ती विभागाला देण्यात आल्यानंतर दोन्ही अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले व आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे होणारी मोठी अनुचित घटना ठरली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये