ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चंद्रपूर प्रदूषण विभागात मनुष्यबळ नसल्यामुळे राज्य सरकार, केंद्र सरकार, जिल्हा पालकमंत्री विरोधात घंटानाद आंदोलन – राजेश बेले

प्रदुषणाच्या तक्रारी बाबतीत ७ दिवसाचे आत कार्यवाही करण्यात यावी.

चांदा ब्लास्ट

घंटा नाद जन आंदोलन करुन तिव्र निषेद जिल्हा पालकमंत्री, जिल्हा अधिकारी, राज्य सरकार, केंद्र सरकार, मा.प्र.नि.म. सदस्य सचिव, सदस्य अध्यक्ष व चंद्रपूर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर या कार्यालयात मनुष्यबळ अधिकारी वर्ग) नसल्यामुळे जिल्हयातील वाढते प्रदूषण लक्षात घेता तत्काळ मनुष्यबळ (अधिकारी वर्ग) देण्यात यावा म्हणून आज दिनांक 18 जुलै 2023 रोजी घंटा नाद आंदोलन करुन तिव्र निषेध जिल्हाधिकारी कार्यालय व महाराष्ट्र प्रदुषण मंडळ चंद्रपूर कार्यालय परिसरातआंदोलन करण्यात आले.

संस्थापक अध्यक्ष राजेश बेले यांनी आज दिनांक 18 जुलै 2023 रोजी घंटा नाद जन आंदोलन करुन तिव्र निषेध जिल्हा पालकमंत्री, जिल्हा अधिकारी, राज्य सरकार, केंद्र सरकार मा.प्र.नि.म. सदस्य सचिव, सदस्य अध्यक्ष व चंद्रपूर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर या कार्यालया अंतर्गत येणारे जिल्हे चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्हा, गडचिरोली जिल्हा येत असते वेळी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर या कार्यलयात फक्त एक उपप्रादेशिक अधिकारी यांच्या राम भरोश्यावर तीन जिल्हयाच्या कामाची जिम्मेदारी असल्यामुळे प्रदुषण ग्रस्त जिल्हयातील प्रदुषण कमी करण्याकरीता उपाय योजनेसाठी मुनष्यबळ आवश्यक आहे.

प्रदुषणाच्या टक्केवारी मध्ये चंद्रपूर जिल्हा भरती मध्ये चौथ्या क्रमांकावरती, महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावरती तसेच यवतमाळ जिल्हयामध्ये पण खुप मोठया प्रमाणात प्रदूषण वाढत आहे. गडचिरोली जिल्हयामध्ये पण लोह खनिज, आर्यन प्लॉन्ट, चुनखडी खानी, सिमेंट प्लॉन्ट सुरु झालेले आहे. तरी सुध्दा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर या कार्यालयात मनुष्यबळ नसल्यामुळे राज्य सरकार, केंद्र सरकार, जिल्हा पालकमंत्री यांच्या तिव्र निषेधांत घंटा नाद आंदोलन करण्यात येत आहे.

प्रमुख्य मागण्या :

1) प्रादेशिक अधिकारी कामय स्वरुपी देण्यात यावे.

2) क्षेत्र अधिकारी 6 देण्यात यावे.

3) प्रदुषणाच्या तक्रारी बाबतीत 7 दिवसाचे आत कार्यवाही करण्यात यावी.

या संपूर्ण मागण्या पूर्ण न झाल्यास राजेश बेले व चंद्रपूर कर घंटा नाद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर कार्यालयाच्या परिसरात करण्यात येणार आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये