ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समाज एकोप्यातून सामाजिक नितीमूल्यांचे संवर्धन – विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार 

ब्रम्हपुरीत कुणबी समाज सभागृह व अभ्यासिकेच्या इमारतीचे भूमिपूजन 

चांदा ब्लास्ट

समाज शिक्षित झाला की त्याची प्रगती निश्चितच आहे. म्हणून आपल्या समाजाला उच्च शिक्षित करणे ही काळाची गरज आहे. मात्र आज समाजात सर्वत्र जाती व धर्माच्या नावाने विष पेरले जात असून समाजात फूट पाडण्याचे कार्य समाज कंटकांकडून सुरू आहे. अश्या वाईट प्रवृत्तींना समूळ नष्ट करण्यासाठी आपण सर्वांनी एकसंघ होऊन अशा देश विघातक प्रवृत्तींचा प्रतिकार करून समाज एकोप्यातून सामाजिक नितीमूल्यांचे संवर्धन करण्यासाठी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन राज्याचे माजी विरोधी पक्षनेते तथा विधिमंडळ पक्षनेते आ विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रम्हपुरी येथे अखिल कुणबी समाज मंडळाच्या सभागृह व अभ्यासिकेच्या इमारतीचे भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.

आयोजित भूमिपूजन सोहळ्यास अध्यक्ष कुणबी समाज मंडळाचे अध्यक्ष रूषी राऊत, तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य डॉ. देविदास जगनाडे, कृउबा सभापती प्रभाकर सेलोकर, सीडीसीसी बॅक संचालक दामोधर मिसार, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, ॲड . गोविंद भेंडारकर,फाल्गुन राऊत, माजी नगराध्यक्षा वनिता ठाकूर, माजी प्राचार्य भाऊराव राऊत, योगेश मिसार, अनिल दोनाडकर, मोंटु पिलारे, डॉ. राकेश तलमले, नेकराज वझाडे, प्रा.प्रकाश बगमारे, राजू पिलारे, हरीचंद्र चोले, माजी नगरसेवक डॉ नितीन ऊराडे, जयश्री कुथे, अल्का खोकले व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार म्हणाले की, कुणबी समाज मंडळाला दिलेले वचन मी पूर्ण केले याचा मला अत्यंत आनंद होत आहे. या विधानसभेचे प्रतिनिधित्व करतांना मी सर्वसमावेशक विकासाला प्राधान्य दिले. म्हणून आज ब्रम्हपुरीत प्रशस्त सुसज्ज अशा प्रशासकीय इमारती, नागरिकांना मुबलक व शुद्ध पेयजल, शहर अंतर्गत रस्ते, नाल्या, भूमिगत गटार, अद्यावत क्रीडांगण मैदान, तलावांचे सुशोभीकरण, यासह स्पर्धा परीक्षांतून उज्वल भविष्याची स्वप्ने बघणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांसाठी विदर्भातील सर्वात मोठी अद्यावत व वातानुकूलित इ – लायब्ररी कार्यान्वीत केली. त्यामुळे आज ब्रम्हपुरीचा चेहरा मोहरा पूर्णतः बदलला आहे. भविष्यातही ब्रम्हपुरी तालुक्यासह संपूर्ण विधानसभा क्षेत्राला राज्यातील विकसनशील क्षेत्राच्या यादीत अग्रेसर आणण्याहेतु प्रयत्नशील असणार असेही ते यावेळी म्हणाले. तत्पूर्वी ब्रम्हपुरी येथे कुणबी समाज सभागृह तथा अभ्यासिका बांधकामकरिता विशेष प्रयत्नातून २.५० कोटी रुपये निधी मंजूर केल्याबाबत अखिल कुणबी समाज मंडळ ब्रह्मपुरीच्या वतीने विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आयोजित कार्यक्रमास मोठ्या संख्येने कुणबी समाज बांधव, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ब्रह्मपुरी वासीय नागरिक उपस्थित होते.

आरक्षण वाचविण्याच्या संघर्षात सामील व्हा – आ. वडेट्टीवार

 मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याऐवजी सरकारने ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्याने ओबीसी प्रवर्गातील 374 जाती व पोट जातींच्या आरक्षणावर गंडांतर आले आहे. आपला न्याय हक्क व आरक्षण पूर्वरत मिळवण्यासाठी समाजाने एकजूट होऊन संघर्ष केला पाहिजे. अन्यथा आपल्या भावी पिढीचे भविष्य संपूर्ण अंधकारमय होईल. म्हणून आरक्षण वाचविण्याच्या संघर्षात सर्वांनी तन-मन-धनाने सामील व्हा असे आव्हान देखील यावेळी विधिमंडळ पक्षनेते आ.विजय वडेट्टीवार यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये