हातलोणी येथे कर्जामुळे शेतकऱ्याची आत्महत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
कोरपना – अतिपावसामुळे शेतीचे होणारे नुकसान व कर्जाला त्रासून कोरपना तालुक्यातील हातलोणी येथील एका शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ११.३० च्या सुमारास घडली.
गजानन पुनम मालेकर (३८) रा.हातलोणी असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे.सतत येणाऱ्या अति पावसामुळे शेतीचे होणारे नुकसान व कर्ज असल्याने तो चिंताग्रस्त असल्याचे समजते.
मंगळवारी रात्री विष प्राशन केल्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे आणण्यात आले.त्यानंतर त्याला चंद्रपूर येथील रुग्णालयात रेफर करण्यात आले. उपचारादरम्यानच त्याचा मध्यरात्री एक वाजताच्या सुमारास रुग्णालयातच मृत्यू झाला. त्याच्या पार्थिवाचे बुधवारी शव विच्छेदन करण्यात आले.
त्याची कुकुडबोडी येथील शेत शिवारात एक हेक्टर शेत जमीन आहे. त्याच्यावर जिल्हा बँकेचे कर्ज होते. त्यांच्या मागे आई वडील, पत्नी, एक मुलगा,एक मुलगी व बराच मोठा परिवार आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.