ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले विद्यालयात बाबासाहेबांना आदरांजली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर : सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय गडचांदूर येथे दिनांक ६ डिसेंबरला महामानव भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. या कार्यक्रमाची अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज काळे होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून बाबासाहेबांचे जीवन कार्यावर सखोल मार्गदर्शन केले.

तसेच बाबासाहेबांनी संपूर्ण देशासाठी कार्य केले असल्याचे मत व्यक्त केले. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे पर्यवेक्षक महेंद्र कुमार ताकसांडे यांनी सुद्धा बाबासाहेबांच्या जीवनातील अनेक घटनांची माहिती सांगितली. महापरिनिर्वाण दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी भाषण स्पर्धा आयोजित करण्यात आली. यात शाळेतील असंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाची संचालन राजेश मांढरे यांनी तर आभार नामदेव बावनकर यांनी मांडले.

कार्यक्रमासाठी सुरेश पाटील, सी एम किंनाके, वासेकर, जी एन बोबडे,ज्योती चटप, माधुरी उमरे, सुषमा शेंडे,भुवनेश्वरी गोपमवार, मेश्राम,आत्राम, आडे, मरस्कोल्हे, श्रीकांत उरकुडे,शशिकांत चन्ने यांचे सह सर्व शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये