ऐतिहासिक बुध्द लेणी भद्रावती येथे दोन दिवसीय भव्य धम्म मेला
जय भीम पंच मंडळ विजासनचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
भद्रावती शहरातील स्थानिक विजासन येथील विजासन जयभीम पंच मंडळाच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिन व विजयादशमी निमित्त येत्या दि. २ व ३ ऑक्टोबर रोज गुरूवार व शुक्रवारला ऐतिहासिक बुध्द लेणी विजासन येथे दोन दिवसीय भव्य धम्म मेला आयोजित करण्यात आला आहे. २ ऑक्टोबरला गुरूवारी सकाळी ११ वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण, बुद्धवंदना आणि महाप्रसाद होणार आहे. ३ ऑक्टोबर शुक्रवारी सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भद्रावती येथील सामाजिक कार्यकर्ते सुशील देवगडे राहणार आहे. या कार्यक्रमात स्वागताध्यक्ष महेंद्र गावंडे, उद्घाटक शंकर मून राहणार आहे.
यावेळी मुख्य अतिथी म्हणून भद्रावती येथील प्रसिद्ध विधीज्ञ ॲड. भूपेंद्र रायपुरे व सामाजिक कार्यकर्ते कुशल मेश्राम उपस्थित राहतील. प्रमुख पाहुणे म्हणून मंचावर सुरज गावंडे, रत्नाकर साठे, अजय लिहितकर ,चंदू चंदनखेडे, राहुल चौधरी, राजू भैसारे, अजय पाटील, विशाल बोरकर, उमेश रामटेके, प्यारेलाल देवगडे, राजू बन्सी रामटेके, डॉ अमित नगराळे, धर्माजी गायकवाड, नामदेव रामटेके, संध्याताई पेटकर, संगमेश्वरी रंगारी प्रामुख्याने उपस्थित असणार आहे.
या दिवशीच्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत बुद्धपुत्री सिने अभिनेत्री दीदी अंजली भारती आणि त्यांचा संच यांचा प्रबोधात्मक गायनाचा सदाबहार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या दोन दिवशीय कार्यक्रमास भद्रावती शहरातील तथा परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन विजासन जय भीम पंच मंडळाचे अध्यक्ष मिलिंद शिंदे, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सचिव अमित फुलझेले, सहसचिव ईश्वर बहादे, कोषाध्यक्ष जवाहर चहांदे तथा सदस्य सर्वश्री प्रा. संघपाल वेले,पवन तेलतुंबडे, रितेश पाटील, मनोज पाझारे,शुभम दुधे, राजन सोनटक्के यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी केले आहे.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आदर्श मेश्राम, आशिष दुपारे, नितीन पेटकर, बिपिन देवगडे, इंद्रपाल पाझारे,रितेश वनकर, रतन पेटकर, वैभव किशोर पाटील, अनिकेत रायपुरे, सचिन चालखुरे, विकास दुर्योधन, स्वप्निल कोल्हटकर, सचिन उगले यांच्यासह शेकडो कार्यकर्ते परिश्रम घेत आहे