आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सेवानिवृत्त शिक्षकानं ऐवजी युवकांना संधी द्या! : सुनिल पाटील अध्यक्ष शिक्षक संघटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

राज्य सरकारने राज्यातील शिक्षक भरतीवर २०११ पासून बंदी घातली होती. ही बंदी २०१९ मध्ये उठली आहे. परंतु बंदी उठून पाच वर्षांचा कालावधी लोटूनही अद्याप शिक्षकांच्या रिक्त जागांची भरती प्रक्रिया सुरु झालेली नाही. बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यातील तरतुदीनुसार प्रत्येक ३० विद्यार्थ्यामागे एक शिक्षक असे अनिवार्य आहे.

     याच नियमाच्या आधारानुसार सध्या राज्यात १८ हजार ४६ जागा रिक्त आहेत. राज्यातील सर्व शाळा ह्या जून महिन्यात सुरु झालेल्या असून जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच, नियोजित शिक्षक भरती संदर्भात उच्च न्यायालयात दाखल रिट याचिकांमुळे भरती प्रक्रीयेस विलंब होत आहे.

       या सर्व परिस्थिती विचारात घेऊन पवित्र प्रणालीमार्फत नियमित शिक्षक भरतीमधून शिक्षक उपलब्ध होईपर्यंत, स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळांतील व खाजगी शिक्षण संस्थांच्या अनुदानित शाळांतील सेवानिवृत्त शिक्षकांमधून कंत्राटी तत्त्वावर तात्पुरत्या स्वरुपात 20000 रुपयांच्या मानधनावर जिल्हा परिषद शाळांतील रिक्त शिक्षकीय पदे भरण्यात येणार आहे.

   राज्यात मोठ्या प्रमाणात D.ed,B.ed प्रशिक्षित बेरोजगार युवकांची संख्या मोठ्या प्रमाणात असताना त्यांना संधी  उपलब्ध देण्या ऐवजी सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्ती देणे हे अकालनिय आहे.

         सबंधित पत्रक त्वरित रद्द करण्यात यावे आणि त्या ऐवजी बेरोजगार युवकांना संधी द्यावी असे निवेदन मा.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री,शिक्षणमंत्री यांना  सुनिल पाटील ,विलास बोबडे,प्रकाश चूनारकर,अविनाश तासलापल्लिवार, जुगल बोरकर,अमोल देठे यांनी संघटनेच्या वतीने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये