ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हृदयाची निगा राखणे काळाची गरज* डॉ. श्रीनिवास सोनटक्के

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर, द्वारा संचालित महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक हृदय दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान संस्थेचे सचिव श्री. धनंजय गोरे यांनी भूषविले तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. श्रीनिवास सोनटक्के हे उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. साईनाथ मेश्राम, उपप्राचार्य श्री. प्रफुल्ल माहुरे, ज्येष्ठ प्रा. नंदा भोयर, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रदिप परसुटकर, प्रा. सचिन भैसारे, प्रा. सुधीर थिपे, प्रा. नरेंद्र हेपट तसेच रासेयो स्वयंसेवक उपस्थित होते. या कार्यक्रमात डॉक्टर श्रीनिवास सोनटक्के यांनी विद्यार्थ्यांना हृदयाची निगा राखणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादित केले व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी केली.

या कार्यक्रमाचे संचालन प्रा. सुधीर थिपे तर आभार प्रदर्शन प्रा. नरेंद्र हेपट यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये