संस्कार भारतीने केले विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांना सन्मानित
घर, समाज आणि राष्ट्राला एकत्र बांधणारी शक्ती म्हणजे मातृशक्ती : कल्पना पलीकुंडवार

चांदा ब्लास्ट
मातृशक्ती ही सृष्टीची मूळ जननी, जगाचे उगमस्थान आहे.तिचा त्याग, करुणा व ममतेतूनच जीवनाला दिशा मिळते.संस्कार, शौर्य व श्रद्धा यांचा वारसा ती पुढील पिढ्यांना देते. घर, समाज आणि राष्ट्राला एकत्र बांधणारी शक्ती म्हणजे मातृशक्ती.तिच्या आशीर्वादाशिवाय समृद्धी, शांतता आणि प्रगती अशक्य आहे. या मातृ शक्तीने विविध क्षेत्रात केलेल्या कामगिरीचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्कार भारतीने आयोजित केलेला हा उपक्रम अभिनंदनीय असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार कल्पना पलीकुंडवार यांनी केले.
27 सप्टेंबर रोजी संस्कार भारती चंद्रपूर तर्फे नवरात्रौत्सवा निमित्त विविध क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या 9 कर्तृत्ववान महिलांना सन्मानित करण्यात आले. स्थानिक न्यू इंडिया कॉन्व्हेंट च्या प्रांगणात संपन्न झालेल्या या कार्यक्रमात मंचावर ज्येष्ठ पत्रकार कल्पना पलीकुंडवार, सेवानिवृत्त शिक्षिका सौ. जयश्री भारत, संस्कार भारती च्या अध्यक्ष संध्या विरमलवार यांची उपस्थिती होती
यावेळी वैद्यकीय क्षेत्रातील डॉ पल्लवी इंगळे, कला क्षेत्रासाठी स्नेहल राऊत, रांगोळीच्या क्षेत्रातील प्रिती नवघरे, नृत्य प्रशिक्षक रेणुका मामीडवार, चित्रकलेच्या क्षेत्रातील ज्योती डाहे, शिक्षण क्षेत्रासाठी अनुराधा भांदककर, संगीत क्षेत्रासाठी सोनाली यादव, सामाजिक सेवे साठी प्रा डॉ ज्योती राखुंडे आणि साहित्य क्षेत्रातील कामगिरी साठी गीता देव्हारे रायपुरे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कारमूर्तीनी आपल्या मनोगतुन संस्कार भारती प्रती कृतज्ञता व्यक्त करत हा सत्कार नवी उमेद व ऊर्जा देणारा असल्याची भावना व्यक्त केली.
प्रास्ताविक उपाध्यक्ष डॉ राम भारत यांनी तर संचालन मंगेश देऊरकर यांनी केले. रेवती बडकेलवार यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लिलेश बरदाळकर, क्षमा धर्मपुरीवार, पूर्वा पुराणिक, आशिष बाला, रेवती बडकेलवार,प्राजक्ता उपरकर, अपर्णा घरोटे, सूरज उमाटे आदींनी परिश्रम घेतले.