राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार
स्थानिक सावली येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथे राष्ट्रीय सेवा योजना दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. चंद्रमौली होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. विपिन चापले गडचिरोली जिल्हा समन्वयक गोंडवाना विद्यापीठ हे उपस्थित होते. विद्यार्थ्यांसाठी कारगिल विजय दिनाचा प्रेरणादायी व्हिडिओ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या युनेस्को वारसा किल्ल्यांवरील माहितीपट दाखविण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. ए. चंद्रमौली होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्व, विद्यार्थी जीवनात राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमांमुळे घडणारे व्यक्तिमत्त्व व समाजाशी जुळणारा सेतू यावर प्रकाश टाकला.राष्ट्रीय सेवा योजना दिन हा केवळ उत्सव नसून तो प्रत्येक विद्यार्थ्यास सामाजिक जाणिवा व जबाबदारी शिकवणारा दिवस असल्याचे त्यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुणे डॉ. विपिन चापले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय सेवा योजना ही केवळ उपक्रम न राहता कर्तव्यभावनेने जोडलेली जीवनपद्धती आहे, असे सांगितले.राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी शिस्त, समाजकार्य, पर्यावरण संवर्धन, ग्रामविकास या क्षेत्रात सक्रिय सहभाग घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमाला प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम अधिकारी प्रा.देवीलाल वताखरे यांच्या मार्गदर्शन झाले. सूत्रसंचालन अंकुश सोनुले यांनी केले आणि आभार प्रदर्शन रक्षा कोटांगले यांनी मानले.