ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एफ.ई.एस.विद्यालयात निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न : शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रसंताचे साहित्य अभ्यासावे – डॉ. बाळ पदवाड 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

श्रीगुरुदेव सेवाश्रम नागपूर अंतर्गत राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळ द्वारा आयोजित आणि राष्ट्रसंत विचार साहित्य परिषदेच्या सहकार्याने जिल्हास्तरीय निःशुल्क निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रसंत साहित्यावर आधारित या निबंध स्पर्धेत १३४३ विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेचे बक्षीस वितरण एफ.ई. एस. शाळेच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रसंत साहित्य अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. बाळ पदवाड यांचे हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ.संजय बेले होते तर नागपूर सेवाश्रमाचे ज्येष्ठ प्रचारक सियाराम चावके, अनिल वराडे , ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. गीता महेशकर , श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे प्रचारक राजेंद्र हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हास्तरीय स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना प्रथम, द्वितीय आणि प्रोत्साहनपर पारितोषिक अतिथींच्या हस्ते वितरित करण्यात आले. बक्षिसाचे स्वरूप रोख रक्कम प्रमाणपत्र, गौरव चिन्ह आणि ग्रंथ असे होते.

स्पर्धेसाठी विशेष सहकार्य करणाऱ्या प्रा. शुभांगी मोहितकर, रोहिणी मंगरूळकर यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. उपस्थित झालेले विजयी स्पर्धक कु. अनुष्का ठमके (जनता विद्यालय ताडाळी), कु. गुंजन झाडे(एफ.एस.गर्ल्स हायस्कूल चंद्रपूर),कु. नंदिनी चहारे (एफ. इ. एस. ज्यु. कालेज) चंद्रपूर ,कु. आंशिका बोमकंटीवार(जनता ज्यु. कॉलेज घुग्घुस), पूर्वा पडगिलवार (छो.पटेल जु. कालेज चंद्रपूर) यांना सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रसंत साहित्य उपयुक्त असून हे साहित्य शाळा महाविद्यालयांध्ये अभ्यासले गेले पाहिजे असे प्रतिपादन डॉ. पदवाड यांनी केले.

उपस्थित अतिथींनी समायोजित विचार व्यक्त करून विजेत्या स्पर्धकांचे अभिनंदन केले. सूत्रसंचालन प्रा. नामदेव मोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. धर्मा गावंडे यांनी केले. आयोजन समितीचे प्रा. डॉ. श्रावण बानासुरे, अभय घटे तसेच शाळेतील शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी याकरिता विशेष परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये