ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शिक्षकांशिवाय हे मानवी जीवन अर्थपूर्ण नाही : उत्क्रांती वानखेडे

लिटल फ्लॉवर इंग्लिश कॉन्व्हेंट पाटाळा येथे शिक्षक दिन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

आपल्या जीवनात शिक्षकाचे अमूल्य योगदान आहे. शिक्षकांशिवाय या मानवी जीवनाला अर्थ नाही, प्रत्येकाच्या जीवनात गुरू किंवा शिक्षक असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आपण सर्वांनी नेहमी शिक्षकांचा आदर करून त्यांच्या शब्दाचे पालन केले पाहिजे.असे मत मुख्याध्यापिका सौ उत्क्रांती वानखेडे यांनी शिक्षक दिनी व्यक्त केले.

सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती लिटल फ्लॉवर इंग्लिश कॉन्व्हेंट, पाटला येथे शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी शाळेतील स्वराज्य कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका बजावली. यावेळी प्राचार्य उत्क्रांती वानखेडे यांनी राधाकृष्णन व मदर तेरेसा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. यानंतर मुख्याध्यापक विकास वानखेडे आणि शिक्षिका भाग्यश्री पोटे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करून या दोन शिक्षकांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल सांगितले. शेवटी विद्यार्थ्यांना मिठाई व अल्पोपहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन सुवर्णा काळे यांनी केले व आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये