ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कामगाराचे आवास योजना अर्ज व दस्तावेज, सरकारी कामगार अधिकारी, वर्धा यांच्या कार्यालयातून गाळ झाल्याबाबत माहिती अधिकार कायदा, २००५ अंतर्गत झाले उघड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

निलेश केवट (कामगार) हे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांच्याकडे नोंदणीकृत सक्रिय कामगार असून या कामगाराची मंडळाकडे पुणे जिल्हा कामगार विभाग यांच्याकडे दि.१४/०७/२०२१ रोजी कामगार नोंदणी झाली. त्यांचा नोंदणी क्र.MH131650015512 हा आहे. श्री केवट (कामगार) यांनी दि.०५ मे २०२२ रोजी सरकारी कामगार अधिकारी, वर्धा यांच्या कार्यालयात सर्व नियम व अटी पूर्ण करून आवास योजना अर्ज व दस्तावेज दिले. तसेच मंडळाचे सचिव विवेक कुंभार यांनी आवास योजने प्रकरणाबाबत सरकारी कामगार अधिकारी वर्धा यांना दि.२४ ऑगस्ट, २०२३ रोजी, श्री. केवट (कामगार) यांच्या आवास योजना प्रकरणात मार्गदर्शन केले.

मार्गदर्शनानुसार श्री केवट यांनी पुन्हा दि.१३/०९/२०२३ रोजी, विनंती अर्ज व आवास योजना प्रकरणात लागणारा दस्तावेज सादर केला असून त्यांच्या आवास योजना प्रकरणात दिरंगाई होत असल्यामुळे त्यांनी माहिती अधिकार कायदा, २००५ अंतर्गत माहितीची मागणी केली असता सरकारी कामगार अधिकारी वर्धा यांच्या तर्फे माहिती देण्यात आली की, आवास योजना अर्ज व दिलेला दस्तावेज कार्यालयात उपलब्ध नाही. याविषयी श्री. केवट (कामगार) हे RTI-2005 नुसार प्रथम अपीलात गेले, परंतु प्रथम अपिलिय अधिकारी तथा सरकारी कामगार अधिकारी, वर्धा हे सुनावणी नोटीस देऊन सुद्धा सुनावणी घेण्यास टाळाटाळ करीत आहे. श्री केवट (कामगार) अशी माहिती देतात की,

सरकारी कामगार अधिकारी, वर्धा यांच्याकडे दि.०५ मे २०२२ रोजी आणि दि.१३/०९/२०२३ रोजी आवास योजना अर्ज व लागणारे सर्व दस्तावेज मी दोन वेळा नियम व अटी पूर्ण करून सादर केले आहे. माझा आवाज योजना अर्ज व दस्तावेज बाबत सरकारी कामगार अधिकारी, वर्धा यांनी दि.१८/०६/२०२४ रोजीच्या जा. क्र./वर्धा./मइवइबाकाकमं/पत्र/२०२४/७५. पत्रानुसार आवास योजना अर्ज व दस्तावेज याची तपासणी करण्यात आली आहे आणि अर्जात नमूद केलेल्या गावी दि.१८/०१/२०२४ रोजी कामगार कार्यालयातले तीन कर्मचारी यांनी प्रत्यक्ष भेट देण्यात आली आहे. (जागेची पाहणी करण्यात आली आहे.) प्रथम पडताळणी झाली असून, सरकारी कामगार अधिकारी, वर्धा हे दि.१८/०९/२०२५ रोजी, परत श्री. केवट (कामगार) यांना पत्र देऊन आवास योजना अर्ज व लागणारे सर्व दस्तावेज याची मागणी करत आहे.

परंतु केवट यांच्या मागणीनुसार वरिष्ठ अधिकारी विभागीय चौकशी करून आवास योजना अर्ज व दस्तावेज सरकारी कामगार कार्यालय वर्धा यांचे कडून गाहाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कार्यवाही करत नाही. केवट म्हणतात की, गेले तीन वर्षापासून मी सातत्याने पाठपुरावा करीत असून दोषी अधिकारी, कर्मचारी संबंधित कार्यालय, वर्धा यांची वरिष्ठ अधिकारी हे पाठ राखण करीत आहे. व कामगाराच्या हातात केळाची टोपली देत आहे. मंडळाकडून कामगारांना मिळणाऱ्या कल्याणकारी हक्काच्या योजना, या प्रकरणात कामगारांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मानसिक व शारीरिक त्रासाला बळी पडावे लागते.

कामगारांना आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रासाला बळी पाडणाऱ्या आणि कामगारांच्या हक्कावर गदा आणणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांचे वर शिस्तभंगाची कार्यवाही करून फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा व त्यांना शासकीय सेवेतून बडतर्फ करण्यात यावे. असे त्रासापोटी कामगाराची मागणी आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये