ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नुकसानभरपाई यादीतून चंद्रपूरला वगळले; जिल्ह्यावर अन्याय

जिल्ह्याचे नाव त्या यादीत तत्काळ समाविष्ट करण्याची मुख्यमंत्र्यांकडे दिनेश चोखारेंची मागणी

चांदा ब्लास्ट

राज्यात जून ते ऑगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे अनेक जिल्ह्यांतील शेती व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने बाधित जिल्ह्यांना मदत जाहीर केली असली तरी, चंद्रपूर जिल्हा या यादीतून वगळल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यावर अन्याय झाल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक व कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिनेश दादाजी चोखारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करून तातडीने जिल्ह्याचे नाव त्या यादीत तत्काळ समाविष्ट करण्याची मागणी केली आहे.

चोखारे यांनी सांगितले की, “जिल्ह्यातील शेकडो हेक्टर शेती व घरे अतिवृष्टीमुळे बाधित झाली आहेत. मात्र मदतीतून वगळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने हा निर्णय तातडीने बदलावा, अन्यथा संघर्षाचा मार्ग पत्करावा लागेल.”

चोखारे यांच्या प्रमुख मागण्या :

जिल्ह्यातील अतिप्रभावित भागांची तात्काळ पाहणी करावी

बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत, कर्जमाफी व तातडीचा दिलासा द्यावा

शेती व घरांचे नुकसान भरून काढण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर करावे

या प्रकरणामुळे चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी वर्गासह सर्वसामान्य नागरिकांमध्येही संतापाची लाट उसळली असून, शासनाने लवकरात लवकर मागण्या मान्य कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये