दारू तस्करांवर स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कार्यवाही

चाड ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
माननीय श्री. अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी दारूची तस्करी करणा-या गुन्हेगारांवर धडक कारवाई करण्याचे स्थानिक गुन्हे शाखेस आदेशीत केल्याने, त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. श्री. विनोद चौधरी व त्यांचे पथकाने दि. 23 सप्टेंबर 2025 रोजी पोलीस स्टेशन वर्धा शहर परीसरात पेट्रोलिंग दरम्यान, मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे दारू तस्कर शाहरूख जलील बेग, रा. राणी दुर्गावती नगर बुरड मोहल्ला वर्धा याचे नालवाडी वर्धा येथील किरायाचे फ्लॅटवर रेड केला असता, सदर फ्लॅटमध्ये तो व त्याचे साथीदार मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारू व बिअर मालासह मोक्कावर तस्करी करतांना मिळुन आले. शाहरूख बेग यास दारू मालाबाबत विचारणा केली असता, त्याने त्याचे मालकिचे दोन चारचाकी वाहनाने इतर साथीदार नामे मनीष मनोज मसराम, बबलु दादाराव कोडापे, विष्णु नामदेव गेडाम, साहिल मिथुन पेंदाम, सर्व रा. बुरड मोहल्ला वर्धा, यांचेसह नागपुर येथे जावुन तेथील वासन वाईन शॉप येथुन अवैधरित्या खरेदी करून, वर्धा जिल्ह्यात आणल्याचे सांगितले. तसेच शाहरूख बेग हा एका अल्पवयीन मुलास दारूविक्री सारखा व्यवसायात ठेवुन त्याचेकडुन दारूविक्री सारखा विवक्षित व्यवसाय करवून घेत असल्याचे निष्पन्न झाले असुन, सदर दारू मालाची तस्करी व अवैध विक्री करीता सदर फ्लॅटचा मालक अजय दिवाकर घुरडे, रा. वार्ड नं. 06 महिंद्रा शोरूम मागे नालवाडी वर्धा याने त्याचा मालकिचा फ्लॅट उपलब्ध करून दिल्याचे निष्पन्न झाल्याने, मोक्कावर मिळुन आलेल्या एकुण 05 आरोपीतांचे ताब्यातुन देशी दारूने भरलेल्या 1,800 सिलबंद शिशा, विदेशी दारूने भरलेल्या 221 सिलबंद शिशा, बिअरचे एकुण 240 नग टिन, 2 फ्रिज, 2 मोबाईल, एक इरतिगा कार क्र. एम.एच. ए.एक्स. .3397, एक स्विफ्ट कार क्र. एम.एच 32 ए.एस. 2418, एक अॅक्सेस 125 मोपेड क्र. एम.एच. 32 ए.एल.6243 असा जु.कि. 27,67,450 रू चा मुद्देमाल जप्त करून, सदर तस्करीमध्ये सहभागी असलेल्या 07 आरोपीतांविरूध्द पो.स्टे. वर्धा शहर येथे दारूबंदी, मोटार वाहन व बाल कामगार कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक श्री. अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, यांचे निर्देशाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक श्री. विनोद चौधरी, पो.उपनि. उमाकांत राठोड, प्रकाश लसुंते, पो.अं मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, हमीद शेख, अमर लाखे, रोशन निंबोळकर, महादेव सानप, पवन पन्नासे, अमरदिप पाटिल, रवि पुरोहित, अक्षय राऊत, अखिल इंगळे, विनोद कापसे, अभिषेक नाईक सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.