ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रत्येक गावात महाश्रमदान मोहीम आयोजित करा- पूलकीत सिंह

"स्वच्छता ही सेवा2025" अंतर्गत"एक दिवस, एक घंटा, एक सोबत"

चांदा ब्लास्ट

दिनांक “17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोंबर 2025” या कालावधीत “स्वच्छता ही सेवा2025” अंतर्गत गाव स्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येत असून, गावात शाश्वत स्वच्छता नांदावी याकरिता गाव श्रमदानातून स्वच्छ करणे गरजेचे आहे .यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात प्रत्येक गावात 25 सप्टेंबर रोजी “एक दिवस, एक घंटा, एक सोबत” या उपक्रमा अंतर्गत महाश्रमदान मोहीम राबविण्यात यावी असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकीत सिंह यांनी केले आहे.

“एक दिवस, एक घंटा ,एक सोबत” या उपक्रमांतर्गत 25 सप्टेंबर 2025 रोजी प्रत्येक गावात महाश्रमदान मोहीम आयोजित करायची असून, या अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी, कार्यालय, संस्थात्मक इमारती, व्यावसायिक व बाजारपेठे ,सार्वजनिक वाहतूक केंद्रे, प्रमुख रस्ते ,महामार्ग, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानके, धार्मिक अध्यात्मिक स्थळे ,प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्य ,ऐतिहासिक वास्तू ,वारसा स्थळे, नदी किनारे ,घाट, नाले इत्यादी ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदान मोहिमेतून स्वच्छ करायचे आहे. या मोहिमेत एनसीसी , एनएसएस तथा शासकीय कर्मचारी यांनी सुद्धा स्वतःहून सहभाग नोंदवायचा आहे. या उपक्रमामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गाव एकाच दिवशी स्वच्छ केले जाणार आहे. या उपक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन गाव स्तरावरील महाश्रमदान मोहीम यशस्वी करावी व आपल्या गावातील सार्वजनिक परिसर स्वच्छ करावा.असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह व प्रकल्प संचालक जल जीवन मिशन मच्छिंद्रनाथ धस यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये