ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना येथे शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा

दिशाभूल करणाऱ्या सरकारला धडा शिकवा – माजी आ. सुभाष धोटे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

कोरपना :- शेतकऱ्यांच्या आयुष्याशी, हक्कांशी आणि भविष्याशी खेळणाऱ्या या महायुती सरकारला जागं करण्याची वेळ आली आहे. शेतकऱ्यांचा आक्रोश, तरुणांचा आक्रोश आणि आई-बहिणींचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी हा मोर्चा निघाला आहे असे जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांनी सांगितले. भाजप सरकारने आपल्या जाहीरनाम्यात दिलेली आश्वासने पाळली नाहीत. शेतकरी, कामगार, महिला, तरुण यांच्या अपेक्षांची पायमल्ली होत आहे. महायुती सरकार हे शेतकरी तसेच जनसामान्यांची फसवणूक करीत आहे. दिशाभूल करणाऱ्या सरकारला धडा शिकवा असे आवाहन त्यांनी केले. ते पुढे म्हणाले की, शासनाने तातडीने महायुतीच्या जाहिरनाम्यातील आश्वासने पूर्ण केली नाहीत आणि जनसामान्यांच्या मागण्यांचा विचार करून तातडीने निर्णय घेतला नाही, तर काँग्रेस पक्ष उग्र आंदोलनाचा मार्ग अवलंब करेल.

काँग्रेसच्या वतीने कोरपना येथे काढण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या जनआक्रोश मोर्च्यात शेतकऱ्यांच्या अनेक ज्वलंत मागण्या मांडण्यात आल्या. यामध्ये कर्जमुक्ती, कापूस पिकासाठी हेक्टरी ₹१ लाख तर सोयाबीनसाठी ₹५० हजार आर्थिक मदत, पिक विमा रकमेची त्वरित अंमलबजावणी, युरिया व कॉम्प्लेक्स खतांचा पुरवठा, निराधार व वृद्धापकाळ पेन्शन ₹२५००, स्थानिक तरुणांना रोजगार, लाडकी बहीण योजनेचे पोर्टल सुरु करणे, ओला दुष्काळ व नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना योग्य नुकसानभरपाई, बेरोजगार युवकांना थकित मानधन देणे यांचा समावेश आहे.

याशिवाय कोरपना उपविभागीय अधिकारी कार्यालय सुरु करणे, अंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, शेतकऱ्यांना वीज कनेक्शन व कृषीपंपांना किमान १२ तास वीजपुरवठा, वनहक्क प्रकरणे तातडीने मंजूर करणे, देवघाट टोलनाक्याची टोलमाफी, वर्ग २ जमिनीचे वर्ग १ मध्ये मोफत रूपांतर, CCI कापूस नोंदणी मुदतवाढ, घरगुती वीजबिलातील वाढ व स्मार्ट मीटर सक्ती रद्द करणे, घरकुल योजनेतून वगळलेल्यांना समाविष्ट करणे, नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे व वसतिगृहे सुरू करणे, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व अनुदान त्वरित देणे, जलजीवन मिशनची कामे पूर्ण करणे, महिला बचत गटांना व्याजमाफी, एसटी व बससेवेतील वाढ व सुधारणा या मागण्याही जोरदारपणे मांडण्यात आल्या. यावेळी कोरपना तहसीलदार यांच्या मार्फत निवेदनाद्वारे शासनाकडे शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांच्या ज्वलंत समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली.

यावेळी काँग्रेसचे जेष्ठ नेते विजयराव बावणे, विठ्ठलराव थिपे, कोरपना काँग्रेसचे तालुकाध्यक्ष उत्तमराव पेचे, दिनकरराव मालेकर, श्यामभाऊ रणदिवे, संभाजी कोव्हे, प्रा. आशिष देरकर, महिला काँग्रेस अध्यक्षा आशाताई खासरे, अशोकराव बावणे, शैलेश लोखंडे, भाऊराव चव्हाण, सचिन भोयर, अभय मुनोत, सुनील झाडे, विजय ठाकरे, रऊप खान, नितीन बावणे, गणेश गोडे, उमेश राजुरकर, इस्माईल शेख, संतोष महाडोळे, संजय एकरे, हारून सिद्दिकी, सुरेंद्र खामणकर, कल्पतरू कन्नाके, अतुल गोरे, विवेक येरणे, देविदास मुन यासह कोरपना काँग्रेसच्या सर्व फ्रंटल आर्गनायझेशनचे पदाधिकारी, कार्यकर्ते शेतकरी बांधव व नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये