आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम’
एस.एन.डी.टी. विद्यापीठात विद्यार्थिनींनी घेतले वित्तीय साक्षरतेचे धडे

चांदा ब्लास्ट
आधुनिक काळात आर्थिक सुबत्तेसाठी बचतीसह गुंतवणुकीवर भर देणे गरजेचे आहे. अनेकजण गुंतवणुकीसाठी ओपन मार्केट चा अवलंब करतात याच पार्श्वभूमीवर एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारात भारतीय प्रतिभूती आणि विनिमय बोर्ड (सेबी) अंतर्गत ‘स्मार्ट निवेशक जागरूकता कार्यक्रम ’ या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यशाळेत गुंतवणुकीचे महत्व , गुंतवणुकीचे प्रकार,ओपनार्केट ची सामान्य सूत्रे, त्यातील धोके व फायदे या विषयी वस्तू आणि सेवा कर विभाजनकर्ता व चार्टर्ड अकाऊंट श्री.विजय जोशी यांनी विद्यार्थी तसेच कर्मचाऱ्यांचे दोन सत्रांमध्ये मार्गदर्शन केले.
या प्रसंगी आवाराचे संचालक डॉ राजेश इंगोले यांनी आपल्या मनोगतातून सर्व कर्मचाऱ्यांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सह प्राध्यापिका अपेक्षा पिंपळे व आभार सह प्राध्यापिका दीपिका उमरे यांनी आभार मानले. सर्व विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सत्राला सकारात्मक प्रतिसाद दिला.