भव्य वित्तीय साक्षरता मेळावा; रिझर्व्ह बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक आणि स्टेट बँकेचा संयुक्त उपक्रम
दुर्गम पाटणमध्ये ३०० हून अधिक ग्रामस्थांची उत्स्फूर्त उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यातील अतिदुर्गम पाटण गावात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक व भारतीय स्टेट बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपंचायत स्तरीय वित्तीय साक्षरता, Re-KYC व जनसुरक्षा मेळावा महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे महाप्रबंधक श्रीराम भोर यांचे अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात पार पडला. कार्यक्रम DFS (Department of Financial Services) उपक्रमांतर्गत घेण्यात आला.
मेळाव्याचे प्रमुख पाहुणे RBI नागपूरचे क्षेत्रीय निदेशक सचिन वाय.शेण्डे होते. तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे क्षेत्रीय प्रबंधक राजकुमार जाधव, DRM रुपेश दलाल, जिवतीचे शाखा व्यवस्थापक गिरीश पेंदोर, गडचांदूरचे शाखा व्यवस्थापक सतीश वर्हाडे, ज्योती कुमार (SBI), मुख्य प्रबंधक SBIशेखर बारापात्रे, पाटणचे SBI शाखा व्यवस्थापक आशिष यादव, आशिष पोरकुटे, सरपंच सिताराम मडावी व नयना शिंदे यांची प्रामुख्यानी उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात पाटण आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांच्या लोकनृत्याने झाली. पाहुण्यांचे स्वागत फुलझाडांच्या कुंड्यांनी करण्यात आले. श्रीराम भोर यांनी Re-KYC, नामांकन, डिजिटल बँकिंग व सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती दिली. शेण्डे सरांनी जिवती तालुक्याची असलेली नाळ जोडून ग्राहकांशी साध्या भाषेत संवाद साधला. महिलांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली. महिला बचत गटांनी लावलेल्या स्टॉलवरील सर्व उत्पादने विकली गेली. शेण्डे सरांनी खरेदी करून गटांचा उत्साह वाढवला. Re-KYC, जनधन खाती व PMJJBY, PMSBY, APY योजनेसाठी सेवा स्टॉल्स लावले गेले.
अल्पोपहार व भोजनाची व्यवस्था होती. पावसातही बँक कर्मचाऱ्यांनी शेकडो ग्राहकांना उपस्थित करून कार्यक्रम यशस्वी केला. हा उपक्रम दुर्गम भागातील आर्थिक साक्षरतेचे आदर्श उदाहरण ठरला.