ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सकल जैन समाजाच्या मेगा ब्लड डोनेशन ड्राईव्ह मध्ये 55 रक्तदात्यांनी केले रक्तदान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 संपूर्ण देशात रक्त पेढ्यामध्ये रक्ताची कमतरता भासत असून रक्ताच्या मागणी नुसार रक्त उपलब्ध होण्यामध्ये अनेकदा रुग्णांच्या नातेवाईकांना व हॉस्पिटल प्रशासनाला अडचणीचा सामना करावा लागत आहे यासाठी सकल जैन समाजाने पुढाकार घेतला असून ठीक ठिकाणी मेगा ब्लड डोनेशन ड्राईव्ह चे नियोजन करण्यात येत आहे.

दिनांक 17 सप्टेंबर 25 रोजी देऊळगाव राजा शहरातील पार्श्वनाथ भवन मध्ये आयोजित रक्तदान शिबिरात 55 रक्त दात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यास हातभार लावला आहे रक्तसंकलनासाठी जालना ब्लड बँकेच्या संपूर्ण टीमने यावेळी फार मोठी मदत केली व रक्तदात्यांना रक्तदान केल्याचे प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले तर तेरा पंथी युवक परिषदेच्या वतीने सर्व दूर आयोजित करण्यात आलेल्या या मेगा ब्लड डोनेशन ड्राईव्ह मध्ये एकाच दिवसात संपूर्ण विश्वात तीन लाख रक्ताच्या बॅग संकलित करण्यामध्ये सकल जैन समाजाला यश आले आहे जागतिक स्तरावर हा एक उच्चांक सकल जैन समाजाने या रक्त संकलन शिबिरातून गाठला आहे.तेरा पंथ युवक परीषद ची स्थापना 17/12/2012 मध्ये झाल्यानंतर दरवर्षी याच दिवशी संपूर्ण विश्वात रक्त दान शिबिराचे आयोजन मोठ्या प्रमाणात कऱण्यात येत आहे.2023 मध्ये या रक्त दान शिबिराची नोंद ग्रीनीज बुक मध्ये नोंदविण्यात आलेली आहे या 2023 मध्ये 2 लाख 38 हजार रक्त दात्यानी रक्त दान केलें होतें.

यावर्षी देऊळगाव महीमध्ये सुद्धा पार पडलेल्या रक्तदान शिबिरात 77 रक्तदात्यानी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यास हातभार लावलेला आहे सकल जैन समाजाचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मेगा ब्लड डोनेशन ड्राईव्ह यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये