आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरी ही खऱ्या अर्थानं सामाजिक संस्था – खुराणा

रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया, चंद्रपूर

रोटरी ही खऱ्या अर्थाने सामाजिक संस्था आहे. पोलिओ निर्मूलनापासून तर जागतिक पातळीवरील विविध सामाजिक उपक्रम या संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येतात. आज या संस्थेचा जागतिक पातळीवर वटवृक्ष तयार झाला आहे असे प्रातिपादन रोटरी क्लब ३०३० चे डीजीई राजिंदर खुराणा यांनी केले.

येथील एनडी हॉटेलमध्ये रोटरी क्लब चंद्रपूर, इनरव्हील क्लब, चंद्रपूर व राेटरॅक्ट क्लब चंद्रपूरच्या २०२३-२४ या वर्षासाठीच्या नविन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा शनिवार ८ जुलै रोजी उत्साहात पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर रोटरी क्लब ३०३० चे डीजीई राजिंदर खुराणा, रोटरी क्लबच्या च्या एजी रमा गर्ग, रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरचे माजी अध्यक्ष अजय जयस्वाल, विद्यमान अध्यक्ष अनुप यादव, सचिव कुंजबिहारी परमार, माजी सहसचिव विशाल खांडरे, इनरव्हील क्लबच्या माजी अध्यक्ष ममता दादुरवाडे, विद्यमान अध्यक्ष राखी बोराडे, सचिव अंजली उत्तरवार, रोटरॅक्ट क्लबचे माजी अध्यक्ष हर्षल मेहाडीया, रोटरॅक्ट क्लबचे अध्यक्ष अक्षय ठाकरे उपस्थित होते. याप्रसंगी रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष अजय जयस्वाल यांनी नवनियुक्त अध्यक्ष अनुप यादव यांना २०२३-२४ या वर्षासाठीचा कार्यभार सुपूर्द केला. याप्रसंगी अनुप यादव यांनी २०२३ – २४ या वर्षासाठीची रोटरी क्लब ऑफ चंद्रपूरची नविन कार्यकारिणी जाहीर केली. तसेच इनरव्हील क्लबच्या नवनियुक्त अध्यक्ष राखी बोराडे यांनीही त्यांची कार्यकारिणी जाहीर केली तर रोटरॅक्ट या युवकांच्या क्लबची कार्यकारिणी अध्यक्ष अक्षय ठाकरे यांनी जाहीर केली. याप्रसंगी मावळते अध्यक्ष अजय जयस्वाल यांनी वर्षभरात राबविण्यात आलेल्या विविध ७४ प्रोजेक्टची माहिती दिली. तर अध्यक्ष अनुप यादव यांनी येत्या वर्षभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. याप्रसंगी मार्गदर्शन करतांना डीजीई राजिंदर खुराणा यांनी रोटरीचे विविध उपक्रम समाजाच्या तळागाळापर्यंत राबविण्यात यावे असे सांगितले. यावेळी एजी रमा गर्ग यांचेही भाषण झाले. कार्यक्रमाला डीएस विरेंद्र पात्रीकर, रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष डॉ.विजय आईंचवार, राम चांदे, मधुसूदन रूंगठा, रोडमल गहलोत, स्मिता ठाकरे, महेश उचके, ॲड. प्रशांत खजांची, अरूण तिखे, रवींद्र जैन, पांडूरंग आंबटकर उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लबच्या नविन १६ सदस्यांना प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन राजश्री मार्कंडेवार व नेहा कोठारी यांनी केलेे. आभार सचिव कुंजबिहारी परमार यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनुपा भामरी, अशोक हासानी, प्रदीप पवार, सहसचिव मिलिंद बोडखे, अजय पालारवार, ॲड.विनायक बापट, मनिष बोराडे, संदिप रामटेके, मनिषा पडगेलवार, अल्का ठाकरे, वृषाली डेकाटे, स्मिता जीवतोडे, डॉ.आसावरी देवतळे, पल्लवी तेलंग, स्मिता खांडरे, सुरज वाघ, नविन चोरडीया, दिनेशकुमार चौधरी, सुधीर बजाज, अमोल धकाते, अजय बलकी, अभय झाडे यांनी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये