महाराष्ट्र

पोलिस स्टेशन सभागृहात होमगार्ड सत्कार कार्यक्रम संपन्न.

होमगार्ड समादेशक इन्चार्ज रेखा बाहूरे यांचा सत्कार.

चांदा ब्लास्ट : चिमूर

 

चंद्रपूर जिल्ह्यातून पहिली महीला  तालुका समादेशक पदावर निवड होण्याचा मान  रेखाताई बाहुरे याना मिळाला असल्याने त्यांच्या सत्कार कार्यक्रम प्रसंगी भाजप माजी तालुका अध्यक्ष डॉ दिलीप शिवरकर म्हणाले की कठीण परिस्थतीतून मार्ग काढत रेखाताई बाहुरे यांनी उंच भरारी घेतली आहे.तेव्हा त्यांचा सत्कार होणे आवश्यक आहे. होमगार्ड चे प्रश्न व समस्या असल्यास त्या सोडविणयासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून सोडविण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगत पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या बेटी बचाव बेटी पढाव अंतर्गत कार्यक्रमाची रेखाताई बाहुरे फलश्रुती ठरली असल्याचे सांगितले.

याप्रसंगी भाजप माजी तालुका अध्यक्ष डॉ दिलीप शिवरकर, कडू गुरुजी माजी सैनिक अशोक कामडी , विलास बनकर, खेमचद समर्थ उपस्थित होते.

दरम्यान  चिमूर होमगार्ड समादेशक इन्चार्ज पदी रेखा बाहुरे कार्यरत असून अश्या कर्तव्य शिल महिलेचा शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले.त्यांनी विविध होमगार्ड शिबिरात उपस्थिती दर्शवून यशस्वी जबाबदरी सांभाळली.

आयोजन  माजी तालुका समादेशक कडू गुरुजी यांनी घेत  कार्यक्रम यशस्वी केला.संचालन रमेश भानारकर गुरुजी यांनी केले.

या कार्यक्रमास मधुकर राऊत,योगेश भैसारे,विनायक मोहिनकर, गजानन बारापात्रे, माला हटवार,मीना भैसारे, अरूणा नागपुरे,निशा नेटीनकर, बाली नंदेश्वर, आशा जुमनाके आदी होमगार्ड उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये