ताज्या घडामोडी

चिमूर विधानसभा क्षेत्रात कांग्रेस जनसंवाद यात्रेची घोडदौड

चांदा ब्लास्ट :सुधाकर श्रीरामे

चिमूर विधानसभा क्षेत्रातील चिमूर व नागभीड तहसील अंतर्गत येणाऱ्या जनसंवाद यात्रेची सुरुवात ३सप्टेंबर पासून गोंडोदा चिमूर आणि नागभीड गोवर्धन चौक येथून सुरु झाली ही यात्रा विधानसभा क्षेत्रातील ज़िल्हा परिषद सर्कल घेऊन भाजप सरकारचे धोरण कसे देशासाठी मारक आहे याचे जनसंवाद यात्रेचे माध्यमातून जनतेच्या दारीं पोहचवीत असल्याने यात्रेला मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.
नागभीड तालुक्यातील तळोधी -वाढोणा जिल्हा परिषद क्षेत्रात कांग्रेसची जनसंवाद यात्रेचे जागोजागी स्वागत करण्यात येतआहे. यावेळी राज्य कर्ते मदमस्त, प्रशासन सुस्त आणि शेतकरी चिंताग्रस्त अशी राज्यात स्थिती आहे ही स्थिती बदलावी अशी भावना शेतकरी बांधवानी व्यक्त केली. तळोधी येथे स्थानिक कांग्रेस कार्यकर्त्याचा उत्साह व पदयात्रेला मिळत असलेली साथ ही कामाची पावती आहे. जिल्हा परिषद तळोधी -वाढोणा क्षेत्रात गावों गावी कॉर्नर सभा आयोजन करून देशाची ६०%जनता शेतीवर अवलंबून आहे अशा कृषी प्रधान देशात शेतकऱ्याच्या प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी केंद्र व राज्यातील सरकारकडे वेळ नाही, शेतकऱ्यांचे प्रश्नाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधून शेतकरी हिताचे, रोजगार निर्मितीचे निर्णय घेण्यास काँग्रेस पक्ष सरकारला भाग पाडेल ही ग्वाही जनसंवाद यात्रेद्धारे मिळत असल्याने जनतेचा उत्फूर्त असा प्रतिसाद तालुकाभर मिळत आहे या जनसंवाद पद यात्रेला मा धनराज भाऊ मुंगले प्रदेश संघटक ओ बी सी विभाग, सतीश वारजूकर माजी अध्यक्ष जिल्हा परिषद चंद्रपूर तालुका अध्यक्ष प्रमोद चौधरी, विनोद भाऊ बोरकर खोजराज मरसकोल्हे जी प सदस्य, संजय अगडे प्रमोद कामडी राहुल बोडले व काँग्रेस कार्यकर्ते मोठया संख्येने सहभागी झाले होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये