भद्रावती येथे विश्व हिंदू परिषद तथा बजरंग दलातर्फे व्हॅलेंटाईन डे चा निषेध
पुलवामा हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
व्हॅलेंटाईन डे ला युवा वर्गाकडून सार्वजनिक स्थळी प्रेमाच्या विकृतीचे प्रदर्शन केल्या जाते. भारतीय संस्कृतीसाठी ही बाब योग्य नाही.त्यामुळे विश्व हिंदू परिषद तथा बजरंग दलातर्फे शहरातील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वाराजवळ व्हॅलेंटाईन डे चा निषेध करून पुलवामा येथील आतंकवादी हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या निमित्ताने शहरातील बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार, भवानी माता मंदिर, गणेश मंदिर व विजासन बुद्ध लेणी अशी बाईक रॅली काढण्यात आली.
यावेळी व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी अश्लील चाळे करणाऱ्या विकृतीचे उच्चाटन व्हावे यासाठी शहरातील सार्वजनिक ठिकाणी प्रतिकात्मक स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भद्रावती हि पर्यटन नगरी आहे, याचे भान ठेवून या पवित्र शहराची बदनामी होऊ नये यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी विश्व हिंदू परिषद तथा बजरंग दलाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.