ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ए.पी.बीएस. थिएटर ग्रुप बल्लारपुने केली पथनाट्याद्वारे जनजागृती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

बल्लारपूर – कोरपना येथील ११ वर्षीय मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचारामुळे संपूर्ण जिल्ह्यात संतापाचे वातावरण आहे. या निषेधार्ह कृत्यावर अनेक ठिकाणी बंदी घालण्यात येत आहे. या प्रश्नावर आवाज उठवण्यासाठी अनिकेत परसावार बहुउद्देशीय संस्था, बल्लारपूर आणि बल्लारपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नाट्य कार्यक्रमात महिलांवर होणाऱ्या सर्व अत्याचारांसह पथनाट्य सादर करण्यात आले. ज्यामध्ये स्त्री भ्रूणहत्या, लैंगिक शोषण, हुंडा प्रथा आणि इतर अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.

या पथनाट्यात कोरपना येथील लैंगिक अत्याचाराचा तीव्र निषेध करण्यात आला. या पथनाट्याचे आयोजन बी. आय. टी. संस्थाचे अध्यक्ष बाबासाहेब वासाडे सरांनी केले. या नाटकात बी. आय. टी. पॉलिटेक्निक विभागाचे प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्षाचे विद्यार्थी सहभागी झाले आहेत. एकूण १३ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. विद्यार्थ्यांनी अवघ्या १२ दिवसांत संपूर्ण नाटक शिकले. अनिकेत परसावार यांनी या पथनाट्यात अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. तसेच लीना मॅडम, प्राचार्य गोजे सर आणि एकूण पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांसमोर हे पथनाट्य सादर करण्यात आले. पथनाट्य हे जनजागृतीचे माध्यम आहे.

या माध्यमाचा वापर करून आम्ही समाजात जनजागृती करण्याचा प्रयत्न केला आहे. महिलांवरील अत्याचाराचा आम्ही तीव्र शब्दात निषेध केला आहे. असे आमच्या वार्ताहराशी बोलताना दिग्दर्शक अनिकेत परसावार यांनी सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये