प्रश्न मंजुषा स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
मयुरेश्वर मित्र मंडळच्या वतीने श्रीराम नवमी व हनुमान जयंतीनिमित्त भव्य स्पर्धा परीक्षा – रामायण आधारित प्रश्नमंजुषा घेण्यात आली होती.
मयुरेश्वर मित्र मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
रामायणावर आधारित या प्रश्नमंजुषा स्पर्धेत एकूण ४० मुलांना बक्षिसांचे वितरण करण्यात आले.
प्रथम क्रमांक – सानिध्य डोंगावकर
द्वितीय क्रमांक – मैथिली विजयकुमार तायडे
तृतीय क्रमांक – कृतिका कुलकर्णी तसेच सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर बक्षिसे देण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वेदभूषण उद्बोध महाराज पैठणकर यांनी भूषवले.
तर प्रमुख अतिथी म्हणून धर्मवीर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष धर्मवीर नागेश्वर ठाकूर यांची उपस्थिती लाभली.
या प्रसंगी सर्व उपस्थित मान्यवरांचे मनःपूर्वक स्वागत व सत्कार करण्यात आला. बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
या यशस्वी आयोजनासाठी मयुरेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष सौरभ जाधव यांच्या नेतृत्वाखाली सर्व परिश्रमी सदस्य –
संकेत तिडके, संदीश पिंपळे, अथर्व टाकळकर, व्यंकटेश कपासे, पार्थ मीनसे, आदित्य काटकर, राम चित्ते, अनिकेत पोळकर, वैभव डोके, सूरज लाड, शुभम उपाध्ये, आदित्य मुळे, अजिंक्य सावजी, पीयूष सावजी,अक्षय औटी यांनी विशेष योगदान दिले.
या उपक्रमामुळे मुलांमध्ये धर्माविषयीची जिज्ञासा, रामायणाचे ज्ञान आणि सामाजिक एकात्मता अधिक दृढ झाली.