आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आपला दवाखाना समोर पाणी साचल्याने रुग्णास उपचार घेण्यास जात असताना अडचणी

नगर परिषदेचे दुर्लक्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. सुधाकर श्रीरामे

महाराष्ट्र राज्य सरकारने शहरी भागातील लोकांना वैद्यकीय सोई सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता तालुका स्तरावर आणि नगर भागात विना मूल्य, मोफत औषधी, तपासणी होत असल्याने शहरी भागातील व्यक्ती सामान्य रुग्णालयात न जाता आपला दवाखाना पसंत करतात यामुळे या दवाखान्यात दिवसेंदिवस गर्दी होताना दिसून येत आहे. मात्र नागभीड येथे ज्या ठिकाणी दवाखाना अस्तित्वात आहे त्या ठिकाणी रस्त्यावर पाणी साचून डबके तयार झाल्याने तपासणी करण्याकरिता येणाऱ्याना त्रास होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. यामुळे तपासणी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे याकडे नगर परिषद व आरोग्य विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष माणिक दोहीतरे यांनी एका निवेदणाद्धारे केली आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये