ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त गावात गोपाळकाला कार्यक्रम उत्साहात साजरा

चांदा ब्लास्ट

श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त ताडाळी गावात गोपाळकाला कार्यक्रम मोठ्या उत्साहात व भक्तीभावाने साजरा करण्यात आला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती, दिनेश दादापाटील चोखारे यांची प्रामुख्याने उपस्थित होती.

सकाळी मंदिरात श्रीकृष्ण पूजन, अभिषेक व भजन-कीर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. मंदिर परिसर भक्तांनी फुलांनी सजविण्यात आला होता.

यावेळी मंडळाकडून दहीहंडी फोड कार्यक्रम पार पडला. पारंपरिक गोपाळकाला प्रसाद – दही, पोहे, काकडी, गूळ, नारळचा ‘काला’ सर्व ग्रामस्थांना वाटण्यात आला. मोठ्या संख्येने गावकरी या प्रसाद वितरणाला उपस्थित होते. गावातील महिलांनी पारंपरिक गोपाळकाला गीते गात कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी गावातील हेमराज दिवसे, चंदू खंडारकर, राजू दिवसे, डॉ. वराटे, अनिल पारखी, प्रभाकर पारखी, विशाल चौधरी, आदींसह ग्रामस्थांची उपस्थिती होती.

या संपूर्ण कार्यक्रमामुळे गावात ऐक्य, भक्ती व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. ग्रामस्थांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये