सावित्रीबाई फुले विद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
-सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित सावित्रीबाई फुले विद्यालय येथे 12 ऑगस्ट ला ग्रंथालय शास्त्रज्ञांचे जनक डॉक्टर एस.आर.रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली.
याप्रसंगी त्यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले सदर कार्यक्रमांच्या अध्यक्ष स्थानी मुख्याध्यापक महेंद्र कुमार ताकसांडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेश मांढरे ग्रंथपाल प्रभाकर पुंजेकर उपस्थित होते याप्रसंगी जयंतीनिमित्त मार्गदर्शकांनी आपले विचार व्यक्त केले ,दैनंदिन जीवनामध्ये पुस्तकांचा महत्व तसेच ग्रंथालयांचे महत्त्व स्पष्ट करून दिले.
सदर कार्यक्रमांचे संचालन जीवन आडे यांनी केले कार्यक्रमासाठी सुरेश पाटील,चंद्रभान किनाके,गजानन बोबडे ,सिताराम आत्राम,भालचंद्र कोगरे, सुषमा शेंडे ,माधुरी उंमरे भुनेश्वरी गोपमवार शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहून सहकार्य केले