सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर येथे तिरंगा रॅलीचे उत्साहात आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
सरस्वती शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर द्वारा संचालित सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयात ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत एक भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीय एकता आणि देशभक्तीची भावना जागृत करण्याचा उद्देश होता.रॅलीला महाविद्यालयाचे प्राचार्य,प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. सकाळी ९.३० वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणातून रॅलीला सुरुवात झाली. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा ध्वज घेऊन ‘भारत माता की जय’, हर घर तिरंगा हर घर संविधान अशा घोषणा देत गडचांदूर शहरातील प्रमुख मार्गांवरून रॅली काढली. रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण केले आणि नागरिकांना ‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचे आवाहन केले.या रॅली करिता नगर परिषद गडचांदूर यांनी मोलाचे सहकार्य करीत विद्यार्थ्यांना बिस्कीट चे वाटप केले. स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ‘हर घर तिरंगा’ अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम आयोजित करण्यात आला असून, यामुळे गडचांदूर परिसरात राष्ट्रीय एकतेचा संदेश पोहोचला.
या तिरंगा रॅलीचा समारोप कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आला.यावेळी समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्रकुमार ताकसांडे होते. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “तिरंगा हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा आणि एकतेचा प्रतीक आहे. या रॅलीद्वारे विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि राष्ट्रीय अभिमानाची भावना वाढेल.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून विभाग प्रमुख प्रा. प्रशांत खैरे हे होते. त्यांनी आपल्या मनोगतातुन भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगत आपल्याला मिळालेले स्वातंत्र्य अबाधीत ठेवण्याची जबाबदारी तरुण विद्यार्थ्यांची आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास समजून घ्यावा स्वातंत्र्य, समता, बंधुत्वाची भावना जोपासावी असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा नितीन सुरपाम यांनी केले.
रॅली व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. विजय मुप्पीडवार, प्रा अशोक सातारकर, प्रा जहिर सय्यद, प्रा दिनकर झाडे,प्रा सोज्वल ताकसांडे,प्रा अनिल मेहरकुरे प्रा जयश्री ताजने, प्रा राजेश बोळे, प्रा शिल्पा कोल्हे, प्रा प्रवीण डफाडे,करण लोणारे,सीताराम पिंपळशेंडे आणि विद्यार्थ्यांनी मोलाचे परिश्रम घेतले.