ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हर घर तिरंगा -हर घर स्वच्छता अभियान राबविण्याचे शासनाचे आदेश

प्रशासक अरुण मोकळ यांच्या पुढाकाराने शहरात ठीक ठिकाणी स्वच्छता मोहिमेसह नागरिकांना आपल्या घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालय स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) यांचे वतीने राज्यातील सर्व नागरि क्षेत्रात हर घर तिरंगा- हर घर स्वच्छता हे अभियान तीन टप्प्यात घेण्याचे आदेशित करण्यात आलेले आहे या आदेशानुसार देऊळगाव राजा नगरपरिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी अरुण देवचंद मोकळ यांनी शहर स्वच्छतेसाठी आराखडा तयार करून नियोजनबद्ध स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे तर या अभियानानुसार शहरातील प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचे आव्हान केले आहे पहिला टप्पा 2 ऑगस्ट 25 ते 7 ऑगस्ट दुसरा टप्पा 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट तिसरा टप्पा 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत विविध कार्यक्रम घेऊन हे अभियान राबविण्यात येणार आहे

 राज्यातील नागरि क्षेत्रात स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत हर घर तिरंगा- हर घर स्वच्छता हे अभियान राबविणे बाबत आदेशित करण्यात आलेले आहे या अभियानात 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या कालावधीत नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांनी जास्त गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी जनजागृती मोहिमेचे आयोजन करावे.

शाळांच्या भिंतीवर तिरंगा प्रेरित कलाकृती काढणे पर्यटन स्थळावर तिरंगा रांगोळी काढणे शासकीय मालमत्ता साठी सामूहिक स्वच्छता मोहीम जागरूकता उपक्रम राबविणे 9 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या कालावधीत बचत गटांच्या मदतीने तिरंगा मेळा (स्थानिक उत्पादनावर लक्ष केंद्रित करून) स्थानिक प्रसिद्ध कलाकारांसह तिरंगा संगीत कार्यक्रम केंद्रीय ठिकाणी आयोजित करून तिरंग्याचे प्रमुख प्रदर्शन करावे 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट स्वच्छता मित्र आणि स्वच्छता कामगारांना स्वातंत्रता दिनाच्या समारंभात आमंत्रित करावे नागरी स्वराज्य संस्थांनी युवा विद्यार्थी संघटना यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा नगरपरिषदेच्या वतीने शहरात सर्वच भागात शासकीय कार्यालय शाळा महाविद्यालय परिसर स्वच्छतेसाठी नियोजन करण्यात आलेले आहेत व स्वच्छता मोहीम राबविण्यास सुरुवात केल्याचे मुख्याधिकारी अरुण मोकळ व स्वच्छता निरीक्षक जतिन नकवाल यांनी सांगितले दिनांक 12 ऑगस्ट रोजी शहरातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये नगर परिषदेचे लेखापाल विश्वजीत गवते, एहसान फारूकी, गणेश मुळे, रामेश्वर माने, मुख्याध्यापक संजय देशमुख, नायकडा सर, श्रीकांत चिकले, उपस्थीत होते.या तिरंगा रॉलित नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये